Job Fair In Goa Dainik Gomantak
गोवा

Job Fair In Goa: शनिवारी गोव्यात भव्य नोकरी मेळावा ; स्थान, वेळ, पात्रता सर्व माहिती जाणून घ्या

गोवा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pharma Jobs In Goa गोव्यात रोजगार उपलब्ध होण्यासाठी गोवा सरकार निरनिराळ्या योजना सुरु करत असते. प्रत्येकाच्या शिक्षणानुसार, अंगी असलेल्या कौशल्यानुसार प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी सरकार नेह,इच प्रयत्नशील असते.

फार्मा क्षेत्रातील इच्छुकांसाठी रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने सरकार गोवा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देत आहे.

4 मार्च रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत जिआयडीसी हॉल मध्ये मुलाखती होणार आहेत. या संबंधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी त्यात असं म्हटलं आहे कि, "गोव्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी गोवा सरकार नेहमीच उत्सुक असते.

मी फार्मास्युटिकल क्षेत्रात पात्रता असलेल्या तरुण गोवावासीयांना या अग्रगण्य कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधीं मिळवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करतो."

गोव्यातील फार्मास्युटिकल क्षेत्रातील युवा वर्गाने या संधीचा पुरेपूर फायदा उठवावा असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. एकंदरीतच या उपक्रमामुळे बहुतांश सुशिक्षित बेरोजगारांना याचा फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT