Grameen Mitra initiative is important to deliver household schemes and services Dainik Gomantak
गोवा

Goa Government: सरकारी योजना आणि सेवा घरोघरी पोचविण्यासाठी ग्रामीण मित्र उपक्रम महत्त्वाचा!

मुख्यमंत्री: माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स खात्याचा स्तुत्य उपक्रम

दैनिक गोमंतक

Goa Government : सरकारी योजना आणि सेवा घरोघरी पोचविण्यासाठी ग्रामीण मित्र उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केले. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद खात्यातर्फे ग्रामीण गोव्यात डिजिटल पाया मजबूत करून डिजिटल सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी ग्रामीण मित्र या उपक्रमाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी (ता. १४)सुरुवात करण्यात आली.

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सरव्यवस्थापक संजय कुमार राकेश, माहिती सचिव संजीव आहुजा, संचालक सुनील उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ग्रामीण मित्र उपक्रमाचा शुभारंभ हा ग्रामीण आणि शहरी गोव्यातील दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

ग्रामीण मित्राद्वारे ग्रामीण जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या आणि सामाजिक - आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. सरकारी सेवा नागरिकांच्या दारी मिळाल्याने वेळ वाचेल. नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सरकारचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्री खंवटे म्हणाले, ग्रामीण मित्र उपक्रम हे डिजिटल पहिले राज्य साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि त्याचे यश सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांसोबत जवळून काम करत आहे. आम्हाला ई-प्रशासन सेवांच्या वितरणास गती देण्यास मदत करेल.

१४४७१ वर फोन करा

नागरिकांना १४४७१ या क्रमांकावर फोन करून सार्वजनिक सेवांची विनंती करावी. जे आठवड्याभर सकाळी ८ वा. ते रात्री ८ वा. पर्यंत चालते. नागरिकांनी कॉल सेंटरद्वारे सार्वजनिक सेवेसाठी विनंती केल्यावर ग्रामीण मित्र संबंधित नागरिकांच्या घरी भेट देवून त्या सेवेसाठी अर्ज करण्यात मदत करेल. गरज असल्यास शुल्क, कागदपत्रे गोळा करेल. आणि संबंधित विभागांकडे जमा करेल.

४०० हून अधिक नेमणुका

नागरिक सेवा केंद्रांद्वारे (सीएससी) गोवा ऑनलाइन अंतर्गत सर्वांना चांगल्या सुविधा मिळाव्यावेत यासाठी सीएससी हा उपक्रम जून २०१८ मध्ये सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून, सरकारने १७० हून अधिक राज्य सरकारी सेवा देणे सुरू केले आहे. सध्या अशी आठ सेंटर सक्रिय आहेत. नव्या उपक्रमानुसार ४०० हून अधिक ग्रामीण मित्र नेमण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT