Drink And Drive checking at Dabolim Airport: राज्यात मद्य प्राशन करून वाहन चालवण्याचे आणि त्यातून होणाऱ्या अपघतांची प्रकरणे समोर आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह विरोधात मोहीम सुरू केली आहे. दाबोळी विमानतळावर आजच्या मोहिमेत दोघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
मद्य घेऊन वाहन चालवताना आढळल्यास चालकाविरोधात सहा महिने कारावास आणि दहा हजार रूपये दंड अथवा दोन्ही अशी शिक्षेची तरदूत आहे.
पोलीस निरीक्षक राहूल दमशाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी दाबोळी विमानतळावर ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह विरोधात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. विमानतळावर येणाऱ्या वाहन चालकांची यावेळी मद्य चाचणी करण्यात आली, यात दोघे दोषी आढळले आहेत.
त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, यापुढे देखील ही मोहिम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
बाणस्तारी येथील भीषण अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विषयाची गंभीर दखल घेतली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवण्यावर कायद्याने बंदी आहे. तरीही काहीजण या नियमाचे पालन करत नाहीत.
तसेच, मद्यालयाच्या बाहेर देखील आता साध्या वेशातील पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे मद्यालयातून बाहेर येणारी व्यक्ती जर वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर नजर ठेवण्यासह त्यांची मद्य चाचणी करून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलीस विभागाने जारी केले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.