Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्‍हादई रक्षणार्थ ग्रामसभांचा हुंकार

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: गोव्याच्या संमतीनेच म्हादई प्रश्न मिटवला, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी एम. के. हुबळी येथे एका कार्यक्रमात केले होते. शहांच्या विधानानंतर राज्यात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद रविवारी ग्रामसभेत पाहायला मिळाले.

मये, केरी, माशेल, बोरी, गुळेली, बांदोडा, बोरी, खांडोळा, ओशेल, कोरगाव, कामुर्ली, लोलये, कुर्टी, चिखली, आसगावात ग्रामस्थ आक्रमक झाले. येथील ग्रामसभेत शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि ग्रामस्थांनी म्हादईप्रश्नी पुन्हा एकजुटीने लढण्याचा ठराव संमत केला.

कोरगाव येथील ग्रासमभेत माजी सरपंच सुदीप कोरगावकर म्हणाले की, म्हादई नदी ही आम्हा गोमंतकीयांची जीवनदायिनी आहे. शहा यांनी गोव्याच्या विरोधात वक्तृत्व केले आहे, कर्नाटकला जल आयोगाने डीपीआरला मंजुरी दिली आहे, ती रद्द करण्यात यावी.

मुख्यमंत्र्यांनी आता तरी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे. कोरगावचे माजी सरपंच नितीन म्हणाले, मुख्यमंत्री सावंत यांनी म्हादई आमची आई म्हणायचे आणि या आईलाच या लोकांनी कर्नाटकला विकण्याचा प्रयत्न केला आहे.

गोव्याच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आता कर्नाटकात जावे आणि जेव्हा म्हादईचा प्रवाह गोव्यात सुरू होईल तेव्हा परत यावे.

आम्ही सरकारबरोबर : केरी पंचायत सदस्य

केरी सरपंच दीक्षा गावस म्हणाले, आम्ही म्हादईचा लढा एकजुटीने लढणार आहोत. त्याचबरोबर सरकार जो काही निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही आहोत. तसेच पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे सत्तरीच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेणार आहेत.

मयेत ‘म्हादई''चे पाणी तापले

मये पंचायतीच्या आजच्या ग्रामसभेत ‘म्हादई’चे पाणी तापले. शहा यांच्या वक्तव्याचा ग्रामसभेत निषेध करून तसा ठरावही एकमताने ग्रामसभेत घेण्यात आला. सरपंच दिलीप शेट यांच्या अध्यक्षतेखाली सभेत संदीप चोडणकर आणि सुभाष किनळेकर यांनी हा ठराव मांडला.

मये पंचायतीच्या आजच्या ग्रामसभेत शहांच्या वक्तव्यावर गरमागरम चर्चा करून संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामसभेला उपसरपंच सुफला चोपडेकर, सीमा आरोंदेकर, विद्यानंद कारबोटकर, वासुदेव गावकर,आदी उपस्थित होते.

केरी येथे समिती गठित

केरी पंचायतीच्या ग्रामसभेत ‘म्हादई बचाव’साठी 20 सभासदांची पंचायत समिती स्थापन केली आहे. त्यात 10 पुरुष तर 10 महिला सभासदांचा समावेश आहे. ही समिती म्हादईविषयी जे निर्णय घेईल त्याला पंचायतीचा पाठिंबा असल्याचे सर्व पंचायत सभासदांनी सांगितले.

वेळ पडल्यास उपोषण करू, असेही ग्रामसभेत सांगण्यात आले. सीताराम गावस यांनी कर्नाटकातील कळसा भंडुरा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, त्याबद्दल जनजागृती पंचायतीतर्फे करण्यात यावी, असा ठराव मांडला.

मुख्यमंत्र्यांना सभागृह समितीसमोर बोलवा : अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांना सभागृह समितीसमोर बोलावून घेऊन त्यांच्याकडून खुलासा घ्यावा, यासाठी तत्काळ बैठक घ्यावी, अशा मागणीचे पत्र आज या समितीचे सदस्य आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना पाठविले आहे. समितीच्या अध्यक्षांनी हे न केल्यास सभागृह समिती फक्त नावालाच आहे, हे सिद्ध होईल, असे सरदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT