Gram Sabha Updates: आज सुरू असलेल्या ग्रामसभा विविध स्थानिक मुद्द्यांवरून गाजल्या. नगरगाव सत्तरी येथील ग्रामसभेला आज रविवारी सभासदांचा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. जेमतेम ९ नागरिक ग्रामसभेला उपस्थित होते.
सरपंच संध्या खाडिलकर, पंच राजेंद्र अभ्यंकर, देवयानी गावकर, उर्मिला गावस, चंद्रकांत मानकर, सचिव विनायक गावकर यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. सचिव विनायक गावकर यांनी मागील सभेचा व्ुत्तांत वाचून दाखविला.
सदर ग्रामसभेत लेखी स्वरुपात नागरिकांनी विविध कामांसाठी अर्ज करावेत. व त्यासाठी २६ ऑक्टोबर शेवटची तारीख दिली होती. पण लेखी मागणीला अतिशय अल्प प्रतिसाद लोकांनी दिला.
IIT ला ग्रामस्थांचा पाठिंबा
IIT च्या समर्थनार्थ रिवण ग्रामपंचायतीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाईंची सभेला उपस्थिती असून त्यांनी 100 टक्के नागरिकांनी IIT साठी संमती दर्शवल्याचे नमूद केले.
शितोळे तळे प्रकल्प रद्द
वादग्रस्त शितोळे तळ्याच्या विषयावरुन बोलावलेली वेरे वाघुर्मेची खास ग्रामसभा तापली. लोकांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले. प्रकल्प नकोच म्हणत ग्रामस्थ आपल्या भुमिकेवर ठाम राहिले.
शितोळे तळ्याच्या प्रकल्पाविषयी माहिती देण्यास आलेल्या जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी परतवले. अखेर अधिकाऱ्यांंनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला.
अखेर लोकांच्या विरोधानंतर पंचायत मंडळाकडून शितोळे तळे प्रकल्प रद्द करण्याबाबतचा ठराव संमत. तळीची केलेली मोडतोडही दुरुस्त करण्याची बाब ठरावात नमूद.
कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेला पाच पंचसदस्य गैरहजर
मये मतदारसंघातील कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेला चक्क पाच पंचसदस्य गैरहजर राहिल्याने नागरिक नाराज झाले. तसेच सभेला ग्रामस्थांचाही अल्प प्रतिसाद दिसून आला. तासभर चाललेल्या ग्रामसभेत कचरा, मोकाट गुरे आणि श्वान अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नवीन बोरी पुलाला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर
प्रस्तावित बोरी पुलाला विरोध करण्यासाठी लोटली ग्रामसभेत ग्रामस्थांंनी मोठी गर्दी केली. पुलासाठी होणारे भूसंपादन थांबवण्याची मागणी ग्रामस्थांंनी केली. तसेच याविरोधात नागरिकांनी रॅली काढत आपला विरोध दर्शवला आहे. शेवटी नवीन बोरी पुलाला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. नागरिकांच्या बाजूनेच असल्याचा दावा सरपंचांनी केला. सरकारने हस्तक्षेप केल्यास विरोध करण्याची ग्रामस्थांची तयारी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.