GPSC exams for various civil cadre posts in October Dainik Gomantak
गोवा

GPSC : सहा महिन्यात GPSCची JSO भरती पूर्ण; 'हे' 20 उमेदवार ठरले पात्र

जीपीएससीकडून कार्मिक विभागाला शिफारस

गोमन्तक डिजिटल टीम

GPSC : कनिष्ठ श्रेणी स्तर पदासाठी गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएससी) 20 अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस सरकारच्या कार्मिक विभागाला केली आहे. गेले तीन दिवस या पदासाठी आयोगामार्फत मुलाखती सुरू होत्या त्या आज संपल्यानंतर ही यादी पाठवण्यात आली आहे.

गोवा लोक सेवा आयोगाने गेल्या सहा वर्षात 34 कनिष्ठ श्रेणी स्तरीय अधिकाऱ्यांची सातवेळा वेगवेगळ्या वेळी परीक्षा घेऊन निवड केली आहे व आता या नव्याने निवड झालेल्या या 20 अधिकाऱ्यांमुळे ही संख्या 54 वर गेली आहे.

गेल्या जुलै 2022 मध्ये गोवा लोकसेवा आयोगाने कनिष्ठ श्रेणी स्तरीय पदे भरण्यासाठी २४ पदांची जाहिरात दिली होती. या पदासाठी सुमारे 3200 उमेदवारांनी अर्ज केले होते. आयोगाने प्राथमिक टप्प्यात या उमेदवारांची पूर्वचाचणी परीक्षा घेतली होती त्यामध्ये 141 उमेदवारच पात्र ठरले होते. या पात्र उमेदवाराना 19 नोव्हेंबर 2022 रोजी स्क्रिनिंग परीक्षेस बोलावण्यात आले होते.

या लेखी परीक्षेसाठी प्रश्‍नपत्रिका 75 गुणांची असते त्यामध्ये इतिहास, शासन, पर्यावरणशास्त्र, जैवविविधता, नवकल्पना, पंचायत राज, सार्वजनिक धोरण, चालू घडामोडी, भूगोल, इंग्रजी याचा विषयांचा समावेश असतो. त्यामध्ये उमेदवारांची बुद्धिमत्ता व विचार तसेच निर्णय घेण्याची क्षमता याचा कस लावला जातो.

आयोगाने घेतलेल्या या लेखी स्क्रिनिंग परीक्षेत 141 पैकी 55 उमेदवारच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. ही लेखी परीक्षा 250 गुणांची असून त्यासाठी चार प्रश्‍नपत्रिका असतात. त्यात कारणे व निर्णय घेण्याची क्षमता, इंग्रजी, सर्वसाधारण ज्ञान व चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना आणि प्रशासनाच्या मूलभूत गोष्टी याचा त्यामध्ये समावेश असतो.

ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी 31 जण उत्तीर्ण झाले. त्यामध्ये सर्वसाधाण - 18, अनुसूचित जमाती 1, इतर मागासवर्गीय 8, अनुसूचित जमाती - 3 व विकलांग -1 उमेदवारांचा समावेश होता. या पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते व मुलाखती 40 गुण ठेवण्यात आले होते.

निवड झालेल्या उमेदवारांमध्ये

सर्वसाधारण गट

मृणाल सिद्धार्थ मराठे, विपुल राघोबा नाईक गावकर, संजना दिपक बांदेकर, नादिया आश्रफ अली शेकोली, सफल कृष्णा शेट्ये, संकेत संदीप साखरदांडे, मंथन मनोज नाईक, साईराज दत्ताराम फडते, अमित नागेश सावंत, रत्नकांत दिनराज गोवेकर, आग्नेलो लेविनो डिसोझा, मंथन मनिष नाईक, कौशिक दत्तगुरू आमोणकर

इतर मागासवर्गीय गट

पांडुरंग दिगंबर गाड, नेहल गजानन तळावलीकर, प्रतिक पांडुरंग पोरोब, भिमनाथ पुरुषोत्तम खोर्जुवेकर तर अनुसूचित जमाती गटात जयेश ब्रम्हानंद मयेकर, अनुसूचित जाती गटात गनराज महादेव मोरजकर व विकलांग गटात लिंडन प्रोवनली कार्दोझो याची नावे आहेत.

गोवा लोक सेवा आयोगाने गेल्या सहा वर्षात 34 कनिष्ठ श्रेणी स्तरीय अधिकाऱ्यांची सातवेळा वेगवेगळ्या वेळी परीक्षा घेऊन निवड केली आहे व आता या नव्याने निवड झालेल्या या 20 अधिकाऱ्यांमुळे ही संख्या 54 वर गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Merces: ..मध्यरात्री मडगावकडे जाणारी बस पेटली! मेरशी सर्कलजवळ घडली थरारक घटना; पर्यटकांची जीव वाचविण्यासाठी धडपड

Assagao Raid: आसगावात 7.30 लाखांचा गांजा जप्‍त; जम्मू काश्मीरच्या व्यक्तीला अटक; सात लाखांची रोकड जप्त

Rashi Bhavishya 04 August 2025: मान-सन्मान मिळू शकतो, वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; करिअरमध्ये सुधारणा

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

SCROLL FOR NEXT