Goa Tax Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: वास्को सारखी घटना पुन्हा घडली तर... टॅक्सी चालकांना पर्यटनमंत्र्यांचा थेट इशारा

टॅक्सी चालकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

Pramod Yadav

Mormugao, Vasco: वास्को येथील मुरगाव बंदरावर उतरलेल्या जवळपास शंभर अमेरिकन प्रवाशांना टॅक्सीने प्रवास करण्यासाठी वेठीस धरल्याची घटना बुधवारी घडली. प्रवाशांना बसने प्रवास करण्यासाठी अडवणूक करून त्यांना अधिक काळासाठी जबरदस्तीने थांबवून ठेवले होते. याप्रकरणाची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी देखील टॅक्सी चालकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम देखील दिला.

मुरगाव येथे क्रुजने (Mormugao Port) आलेल्या अमेरिकन पर्यटकांना बसने प्रवास करण्यास टॅक्सी चालकांनी रोखल्याची घटना निषेधार्ह आहे. अशा प्रकारे कोणी करत असल्यास त्याविरोधात सक्त कारवाई केली जाईल. तसेच, टॅक्सी चालकांनी बस चालकांना धमकावल्यास तर टॅक्सी चालकांना अटक केली जाणार आहे. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. शिवाय घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, आता या प्रकरणावरून पर्यटनमंत्री रोहन खंवटे (Tourism Minister Rohan Khaunte) यांनी देखील टॅक्सी चालकांना मोठा इशारा दिला आहे. मंत्री खंवटे म्हणाले, मुरगाव, वास्को सारखे प्रकरण पुन्हा घडले तर, संबधित टॅक्सी चालकाचा थेट परवाना रद्द केला जाईल. असा इशारा मंत्री खंवटे यांनी टॅक्सी चालकांना दिला आहे. त्यामुळे यापुढे टॅक्सी चालकांनी पर्यटकांवर मुजोरी केल्यास त्यांच्यावर थेट परवाना रद्दची कारवाई होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT