Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा परिसरात तीन हॉटेल्स; महसूल मात्र नगण्यच

Mopa Airport: मोपा विमानतळ प्रकल्पासाठी सरकारने जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला दिलेली जमीन पोटभाड्याने तीन हॉटेल्स उभारण्यासाठी 60 वर्षांच्या कराराने देण्यास जीएमआर कंपनीला मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: मोपा विमानतळ प्रकल्पासाठी सरकारने जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला दिलेली जमीन पोटभाड्याने तीन हॉटेल्स उभारण्यासाठी 60 वर्षांच्या कराराने देण्यास जीएमआर कंपनीला मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

या प्रकल्पातून सरकारला महसुलाचा 36.99 टक्के वाटा मिळणार असून 2 हजार 132 एकर जमीन कंपनीला देण्यात आली आहे. 1 हजार 750 विमानतळासाठी वापरल्यानंतर शिल्लक असलेल्या 381 एकर जमीन वाणिज्यिक वापरासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. त्यापैकी 149 एकर जमीन पार्किंग, इंधन व्यवस्था व इतर सोयींसाठी असून उर्वरित 232 एकर जमीन अर्थार्जनासाठीच्या उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.

या जमिनीपैकी 2.13 एकरातील भूखंड एनकाल्म हॉस्पिटॅलिटी, कन्वेन्षन हॉटेल्स, रूटस् कॉर्पोरेशन या कंपन्यांना 60 वर्षांच्या कराराने देण्यासाठी कंपनीने सरकारकडे परवानगी मागितली होती. या करारातून सरकारला एका वेळी प्रतिएकरामागे ५ कोटी रुपये, दरवर्षी 120 रुपये प्रतिचौरस फूट शुल्क आणि महसुलातील 1.5 टक्के वाटा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT