Govind Gawade Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: CM सावंतांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांची अन् माझी भेट कधीच घडवून आणली नाही, गावडेंचा जाहीर सभेतून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुख्यमंत्र्यांनी माझी आणि केंद्रीय नेत्यांची कधीच भेट घडवून आणली नाही, असे म्हणत त्यांनी सावंतांवर हा निशाणा साधला.

Manish Jadhav

माशेल: गोव्यातील राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे माजी मंत्री गोविंद गावडे. सावंत मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आमदार गावडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर माशेल येथे रविवारी (22 जून) आयोजित सभेतून आमदार गावडे यांनी खंत व्यक्त करत मुख्यमंत्री सावंतांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी माझी आणि केंद्रीय नेत्यांची कधीच भेट घडवून आणली नाही, असे म्हणत त्यांनी सावंतांवर हा निशाणा साधला.

“भाजपमध्ये प्रवेश करताना मी कोणत्याही केंद्रीय नेत्यांची भेट घेतली नव्हती, फक्त डॉ. प्रमोद सावंतांवर विश्वास ठेवला होता. 2022 मध्ये मंत्री झाल्यावर मी विनंती केली होती की मला पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची ओळख करुन द्यावी. मात्र, ती भेट कधीच घडवून आणली गेली नाही. आता मला समजतंय, यामागे नेमकं काय कारण होतं," असं सांगत गावडेंनी स्पष्ट संकेत दिले की पक्षात त्यांच्याविषयी ठरवून दुर्लक्ष झालं.

गावडे पुढे म्हणाले, "2019 मध्ये शिरोड्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांना विजयी करण्यासाठी मी जीव ओतून काम केले. भाजपचे कार्यकर्ते शांत होते, तेव्हा मी त्यांच्या प्रचारात गुंतलो होतो. त्यांचा विजय कमी मतांच्या फरकाने झाला आणि त्या मतांचा मोठा हिस्सा माझ्या पाठिंब्यामुळे मिळाला होता."

गावडेंनी शिरोडकरांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यासोबतच त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावरही नाराजी व्यक्त केली. गावडे म्हणाले की, पक्षात दिलेल्या योगदानाची त्यांना किंमत चुकवावी लागली. निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव होता.

गावडेंचा प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल!

ज्या माणसाला आपल्या पदाचा 'वालोर' माहिती नाही तो माणूस माझे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी माझ्याबाबतीत 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे विधान करतो. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई कोण करणार? असे म्हणत गावडेंनी पुढे नाव‌ न घेता प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांंवरही टीकास्त्र डागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Bangalore Special Train: नाताळ आणि नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वेगाड्या, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Shilpa Shetty Goa Hotel: शिल्पा शेट्टीच्या 'बास्टिन रिव्हेरा' हॉटेलवर पडणार हातोडा? खारफुटीच्या जमिनीत बांधकामास परवानी कशी? कोसंबेंचा सवाल

Uterine Cancer: राज्यात 'एचपीव्‍ही'मुळे दरमहा आठ महिलांना गर्भाशय कॅन्‍सर, 5 वर्षांत 527 रुग्‍ण

Goa Politics: काँग्रेसजनांनी 'आप'मध्ये यावे, अरविंद केजरीवालांची काँग्रेस कार्यकर्त्यांना हाक

Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT