Panaji : विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची पायरी ही महत्त्वाची असते. अनुसूचित जाती जमातीतील मुलांना पैशांअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही, अशी आज परिस्थिती नाही. शिक्षणासाठी सरकारी योजना आहेत. तेव्हा जिद्द आणि चिकाटी बाळगून ध्येयाकडे वाटचाल करा, असे आवाहन कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी येथे केले.
रविवारी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) तर्फे झालेल्या, तिसवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात गोविंद गावडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सन्मानीय पाहुणे म्हणून आमदार तथा खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष आंतोनिओ वाझ, ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप, माजी आमदार वासूदेव गावकर, शिक्षण उपसंचालक उदय गावकर, तिसवाडी तालुका समन्वयक सुभाष कुट्टीकर व भालचंद्र उसगावकर, दुर्गादास गावडे, विश्वास गावस, रोहिदास दिवाडकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दहावी, बारावी परीक्षेत सत्तर व सत्तर टक्यांपेक्षाहून जास्त गुण मिळविलेल्या १५९ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.तसेंच ‘नीट’ मध्ये गोव्यात प्रथम आलेली ग्रेसिना कुलासो हिचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रकाश वेळीप म्हणाले,की विद्यार्थ्यांसाठी अनेक सरकारी योजना आहेत, त्यांचा लाभ घ्यावा. समाज तुम्हाला देईल ही अपेक्षा न ठेवता तुम्ही समाजाला देण्याचा प्रयत्न करा.
आंतोनिओ वाझ म्हणाले, खादी ग्रामोद्योगतर्फे आज उद्योगासाठी तुम्हाला ५० लाख रुपये कर्जस्वरूपात तातडीने मिळतात, मी स्वतः कष्टातून वर आलो त्याचे फळ मला मिळाले. अनिल गावकर यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मीकांत गावस यांनी आभार मानले. पुष्पा हडकोणकर व मनाली शिरोडकर यानी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.