Goa Theft Case : गोव्यातून 4 रेंट ए बाईक चोरल्याप्रकरणी कोल्हापूरचा अट्टल दुचाकी चोरटा गजाआड

संशयित सद्दाम जमादारला अटक; चौकशी सुरू
Goa Theft
Goa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji: गोव्यातील ‘रेंट ए बाईक’ भाडेपट्टीवर घेऊन चोरल्‍याप्रकरणी पणजी पोलिसांनी गांधीनगर-कोल्हापूर येथील सद्दाम खलबुद्दीन जमादार (३२ वर्षे) याला अटक केली आहे. त्याने गोव्यातून बोगस आधारकार्डच्या मदतीने चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याची कोठडी घेतली आहे. चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्रातील विविध भागांत विकल्याने त्या जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिली.

संशयित सद्दाम जमादार याने काल पाटो-पणजी येथील सचिन उसगावकर यांच्या रेंट अ बाईक कार्यालयात येऊन भाडेपट्टीवर दुचाकी हवी असल्याचे सांगितले. त्याला एक दुचाकी दाखवण्यात आली; मात्र त्याने कार्यालयाबाहेर उभी करून ठेवण्यात आलेली पांढऱ्या रंगाची नवीन ‘६जी ॲक्टिवा’ हवी आहे, असे सांगितले.

उसगावकर यांनी दुचाकीची चावी दिली असता तो गाडी घेऊन तेथून पसार झाला. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच उसगावकर व इतरांनी पाठलाग केला. कदंब बसस्थानकाजवळ तो पडला व त्याला दुखापत झाली. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Goa Theft
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; वाचा आजच्या किमती

असा घातला गंडा

संशयित सद्दाम जमादारची कसून चौकशी केली असता त्याने आणखी दुचाकी भाडेपट्टीवर घेऊन महाराष्ट्रात नेल्याची कबुली दिली. पाटो येथून कोझी नूक रेंट ए बाईक मधून दुचाकी भाड्याने घेतली. नंतर ती परत केली नाही.संशयिताने सांताक्रुझ येथून राजेश ओशेलकरकडून भाडेपट्टीवर दुचाकी घेतली होती. ओळखपत्र म्हणून खोटे आधारकार्ड दिले होते. पाटो येथील एक्स्प्रेस टुर्स अँड ट्रव्हल्समधील वालंकिणी आर कार रेन्टल्समधूनही एक दुचाकी भाडेपट्टीवर घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com