Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

वेरे-वाघुर्मे, वळवईत नवीन जलवाहिनीचा शुभारंभ; बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील - गोविंद गावडे

मंत्री गोविंद गावडे : वेरे-वाघुर्मे, वळवईत नवीन जलवाहिनीचा शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

सावईवेरे : मुर्डी भागात म्हादई नदीवर 108 कोटी रुपये खर्चाची योजना असून तेथे बंधाऱ्याचे काम सुरू आहे. शितोळ तळ्याच्या प्रकल्पासाठी साळगावकरकडून 2700 चौ. मी. जागा मोफत मिळाली असून या प्रकल्पासाठी 27 कोटी रुपये खर्च होणार आहे. विकासकामांसह या भागात पर्यटकांना आकर्षित करून बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती प्रियोळचे आमदार तथा क्रीडा, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

वेरे-वाघुर्मे ग्रामपंचायत क्षेत्रातील कावंगाळ, मधलावाडा, कोणिर-सावई ते घाणो तसेच वळवई ग्रामपंचायत क्षेत्रात सुमारे 5 कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठ्यासाठी पाण्याची नवीन जलवाहिनी घालण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ सोहळा वेरे-वाघुर्मे पंचायतीच्या प्रांगणात संपन्न झाला.

यावेळी गावडे बोलत होते. व्यासपीठावर उपसरपंच बाबू गावडे, पंच अक्षय नाईक, रोहन तारी, नवनाथ वेलकासकर, लोचन नाईक, स्वाती पालकर, हर्षा गावडे, पाणी खात्याचे सहाय्यक अभियंता जांबावलीकर आदी उपस्थित होते. मंत्र्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून जलवाहिन्या घालण्याचा शुभारंभ सोहळा पार पडला.

मान्यवरांची उपस्थिती

शुभारंभ सोहळ्याला कुर्टी जि. पं. सदस्या प्रिया चारी, जि. पं. सदस्य श्रमेश भोसले, सरपंच शोभा पेरणी, वळवई सरपंच विनायक वेंगुर्लेकर, तिवरे सरपंच जयेश नाईक आदी मान्यवर हजर होते. सूत्रसंचालन दीपक वेलकासकर यांनी तर बाबू गावडे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

Panajim: सहा दिवस उलटले, मांडवीत बुडालेली बोट काढण्यासाठी अजूनही हालचाली नाही

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT