Minister Govind Gaude And Speaker Ramesh Tawadkar
काणकोण : आदिवासी कल्याण खात्याची गरजच काय, असे बेताल वक्तव्य करीत आदिवासी समाजाबद्दलचा पुळका दाखवणाऱ्या मंत्री गावडे यांच्यावर आज सभापती रमेश तवडकर यांनी नाव न घेता तोफ डागली. त्यांचे वक्तव्य हे केवळ वाद निर्माण व्हावा यासाठीच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
तवडकर म्हणाले, की ‘उटा’ आंदोलनानंतर मी आदिवासी कल्याण खात्याचा मंत्री झालो. त्यावेळी या खात्याचा कारभार आल्तिनो येथील एका बंगल्यातून चालत होता. मंत्री म्हणून ताबा घेतल्यानंतर कार्यालय उभारले. तसेच आदिवासींसाठी २५ योजना सुरू केल्या. त्यामुळे आदिवासी कल्याण खाते हवेच कशाला, असे म्हणणे दुर्दैवी आहे.
केवळ श्रेयवादासाठी केलेले हे विधान आहे, असे तवडकर म्हणाले. गावडोंगरी - खोतिगाव येथील आदर्श युवा संघाने आदिवासी कल्याण खात्याच्या सहकार्याने आयोजित आमोणे-पैंगीण येथील संकल्प दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
उटा आंदोलन आणि दोन युवकांचे बलिदान हा समाजाच्या इतिहासातील संघर्षमय कालावधी आहे. त्यात आदर्श युवा संघाच्या कार्यकर्त्यांनी सर्वस्व त्यागले. केपे व सांगे येथील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रमुख भूमिका बजावली. मात्र, आता या सर्व कार्याचे श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. मात्र, समाजातील घटक हे सर्व जाणून आहेत. त्यासाठी त्यांना प्रत्युत्तर न देता समाजाप्रती कार्य करणे सुरू ठेवणे गरजेचे आहे, असे सभापती म्हणाले.
ज्या मंत्र्यांनी आदिवासी खात्याबद्दल आज वादग्रस्त विधान केले, तेच यापूर्वी या खात्याचे मंत्री होते. आता हे खाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे आहे. आदिवासी समाजाच्या समस्या असतील, तर ते स्वत: मंत्रिमंडळात मांडू शकतात. असे सार्वजनिक बोलणे योग्य नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.