Govind Gaude and Deepak Dhavalikar clash over 2027 elections
पणजी: प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे आणि ‘मगोप’चे अध्यक्ष तथा माजी आमदार दीपक ढवळीकर यांच्यात सध्या शाब्दिक चिखलफेक सुरू आहे. २०२७ च्या निवडणुकीवरून दोन्ही नेत्यांतील वाद पुन्हा उफाळल्याचे दिसते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी, युतीमध्ये असल्याने जाहीर वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला मगोपच्या नेत्यांना दिला आहे.
कांपाल येथील ॲक्वा मेगा फिश फेस्टिव्हलला रविवारी दुपारी त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री गावडे आणि मगोप नेते दीपक ढवळीकर यांच्यात दोन दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे. ढवळीकर यांनी एका मुलाखतीत फोंडा तालुक्यातील मतदारसंघात २०२७ च्या निवडणुकीत आपण उभे राहणार असून, आपले प्राबल्य आहे तेथे प्राधान्य देऊ, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर गावडे यांनी युतीतून बाहेर पडण्याचा सल्ला मगोपला दिला होता. त्यावर ढवळीकरांनीही प्रतिवाद केल्यामुळे या वादाची राज्यभर चर्चा सुरू होती.
या दोन्ही नेत्यांमधील वादावर तानावडे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मगोप नेत्यांनाही युतीचा धर्म पाळण्याचा सूचक सल्ला दिला आहे. २०२७ ची निवडणूक आम्ही एकत्रित लढू, पण ज्या जागांवर भाजपचे आमदार आहेत, त्याविषयी त्यांनी बोलू नये आणि जागावाटपावर आताच विधान करणे योग्य नाही. विशेषतः भाजपचे जेथे आमदार आहेत, त्या जागा मागणे योग्य नाही. युतीत असल्याने मगोपने जाहीर व्यक्तव्य करू नये, असे तानावडे म्हणाले.
ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना समान दर्जा दिला जात आहे. नवीन-जुना असा भेद केला जात नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची माझी जबाबदारी आहे, असेही तानावडे यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.