Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

येत्या तीन वर्षांत तीन मोठ्या स्पर्धा!

खेळाडूंसाठी प्रेरणा : आशियाई बीच स्पर्धेसाठीही प्रयत्न : गोविंद गावडे

दैनिक गोमन्तक

पणजी : केवळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर येत्या तीन वर्षांत प्रतिष्ठेची आशियाई बीच स्पर्धा, तसेच खेलो इंडिया यूथ गेम्स गोव्यात घेण्यास प्राधान्यक्रम आहे. मोठ्या स्पर्धांच्या आयोजनामुळे राज्यातील क्रीडापटूंना मोठी प्रेरणा मिळेल, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शुक्रवारी ‘गोमन्तक’ला सांगितले.

‘राज्यातील पावसाळ्यामुळे सप्टेंबरमध्ये 36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेणे शक्यच नाही. येथील पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत लांबतो. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज होण्यासाठी पुरेसा कालावधी हवाच. सराव सामन्यांसाठी मैदाने, तसेच मुख्य मैदान असलेल्या फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या छप्पराचे कामही ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे. काही थोडी कामे बाकी आहेत. जानेवारी-फेब्रुवारीत ही स्पर्धा आम्ही पूर्ण क्षमतेने यशस्वीपणे आयोजित करू. या माहितीसह सोमवारपर्यंत केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मान्यतेने अधिकृत पत्र पाठविण्यात येईल,’ असे मंत्री गावडे यांनी सांगितले.

गोव्यात नियोजित असलेली ही स्पर्धा वारंवार लांबणीवर गेली असून मे 2020 मध्ये कोविडमुळे बेमुदत पुढे ढकलण्यात आली होती. ही स्पर्धा गोव्याने लवकर घ्यावी यासाठी आयओएने केंद्रीय क्रीडा मंत्रालयास पत्र पाठवून सहकार्य अपेक्षिले आहे. त्या अनुषंगाने गोवा सरकारने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

2024-25 पर्यंत प्रमुख स्पर्धा

आशियाई बीच स्पर्धेच्या यजमानपदासाठी गोव्यास पसंती आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स गोव्यात व्हावी असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयास वाटते. पंचकुला येथे झालेल्या स्पर्धेच्या कालावधीत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा झाली, ते गोव्यात स्पर्धा घेण्याबाबत अनुकूल आहेत, असे गावडे यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्पर्धेमुळे राज्यात साधनसुविधा तयार असतील आणि त्यामुळे 2024-25 पर्यंत या मोठ्या स्पर्धा घेणे शक्य आहे, असे त्यांना वाटते.

‘वर्ल्डकप’साठी सज्ज

17 वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धेतील सर्वांत जास्त सामने गोव्यात होत आहेत. या स्पर्धेसाठी ऑगस्टपर्यंत गोवा सज्ज होईल, असे क्रीडामंत्री गावडे यांनी विश्‍वासपूर्वक सांगितले. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ‘वर्ल्डकप’बाबत अजिबात चिंता नाही, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Goa News: गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य कार्यालयात लक्ष्मी पूजन

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT