Govind Gaude corruption allegation X
गोवा

Govind Gaude: मंत्री गावडेंचा विषय पोचला दिल्‍लीपर्यंत! उचलबांगडीचे संकेत; CM सावंतांनी केले सुतोवाच

Goa Politics: मंत्री गोविंद गावडे सध्‍या राज्याबाहेर आहेत. ते २९ मे रोजी गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. ३० रोजी गावडेंना पक्षाकडून समन्स जारी करण्‍यात येईल.

Sameer Panditrao

पणजी: कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी मुख्‍यमंत्र्यांच्‍या अखत्यारीतील आदिवासी कल्‍याण खात्‍यात भ्रष्‍टाचार होत असल्‍याचा आरोप केल्‍याने त्‍याची दखल दिल्‍लीतूनही घेण्‍यात आली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर गावडेंची गच्‍छंती अटळ असून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या पाठोपाठ सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तसे थेट सुतोवाच केले.

मुख्यमंत्र्यांना आज मंत्रालयात पत्रकारांनी गावडे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, ‘जबाबदार मंत्र्याने बेजबाबदार विधाने करू नयेत. बेजबाबदार विधाने करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई ही होणारच. यावर कारवाई कधी होणार असे विचारल्यावर कारवाई झाल्यावर दिसेल, तोवर प्रतीक्षा करा’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या विषयावर दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे का असे विचारल्यावर त्यांनी कारवाई होणार असे सांगितले. आमदार हा मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने मंत्री होतो.

तो त्या पदावर राज्यपाल व मुख्यमंत्री यांची मर्जी असेतोपर्यंत तो मंत्रिपदी राहू शकतो याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याव्यतिरिक्त अन्य कारवाईचे कोणते पर्याय आहेत अशी विचारणा केली असता कारवाई होईपर्यंत थांबा असे ठरावीक साच्यातील उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, मंत्री गोविंद गावडे सध्‍या राज्याबाहेर आहेत. ते २९ मे रोजी गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. ३० रोजी गावडेंना पक्षाकडून समन्स जारी करण्‍यात येईल. मुख्यमंत्र्यांना आज मंत्रालयात पत्रकारांनी गावडे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, ‘जबाबदार मंत्र्याने बेजबाबदार विधाने करू नयेत. बेजबाबदार विधाने करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई ही होणारच.

यावर कारवाई कधी होणार असे विचारल्यावर कारवाई झाल्यावर दिसेल, तोवर प्रतीक्षा करा’, असे मुख्यमंत्री म्हणाले. या विषयावर दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे का असे विचारल्यावर त्यांनी कारवाई होणार असे सांगितले. आमदार हा मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने मंत्री होतो. तो त्या पदावर राज्यपाल व मुख्यमंत्री यांची मर्जी असेतोपर्यंत तो मंत्रिपदी राहू शकतो याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याव्यतिरिक्त अन्य कारवाईचे कोणते पर्याय आहेत अशी विचारणा केली असता कारवाई होईपर्यंत थांबा असे ठरावीक साच्यातील उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, मंत्री गोविंद गावडे सध्‍या राज्याबाहेर आहेत. ते २९ मे रोजी गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. ३० रोजी गावडेंना पक्षाकडून समन्स जारी करण्‍यात येईल.

Sharad Ponkshe, Govind Gaude, Kala Academy

कामतना संधी शक्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सध्या नाशिकमध्ये आहेत. ते २९ रोजी गोव्यात येणार आहेत. त्यानंतर ३१ मे व १ जून रोजी ते दिल्लीत असतील. त्याचवेळी मंत्रिमंडळातील फेरबदलाचा निर्णय दिल्लीत होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

हा फेरबदल केवळ गावडे यांच्यापुरता मर्यादित राहणार नसून आणखीन काहीजणांना डच्चू मिळणार असल्याचे संकेत आहेत. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे सध्या केरळमध्ये आहेत. ते २८ रोजी सायंकाळी गोव्यात पोचणार आहेत.

गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटविल्‍यास मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिपदी संधी मिळू शकते.

काँग्रेसकडून टीका

काँग्रेसचे गिरीश चोडणकर म्हणाले, ‘सध्या सत्तेवर असलेल्या भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराची चिंताजनक प्रवृत्ती दिसून येत आहे, याकडे मंत्रिमंडळातील मंत्री गावडे यांनीच लक्ष वेधले आहे. गावडे यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर प्रकाश पडतो आणि त्यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

गावडे-तवडकर मतभेद; असा गेला वाद विकोपाला

कला अकादमीच्या इमारतीला गळती लागली, ध्वनी यंत्रणा सदोष निघाली, छताचे तुकडे पडले, खुले सभागृह कोसळले. अशा या गोष्टी घडत असताना गावडे टीकेचे धनी झाले तरी सरकारी पातळीवर त्यांची आजवर पाठराखणच करण्यात येत होती. सभापती तवडकर व गावडे यांचे पटत नाही. दोघांनीही जाहीरपणे एकमेकांचा उपमर्द केल्यानंतर मुख्यमंत्री व तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो वाद मिटला नाही आणि मंत्री आपला अपमान करतो अशी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आदिवासी समाजाचा नेता कोण या छुप्या संघर्षातून उफाळलेला वाद आता विकोपाला गेला आहे.

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. प्रत्येकवेळी उचलली जीभ लावली टाळ्याला असे होणार नाही. ही असली बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त इशारा नाही, तर त्याप्रमाणे योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली जाईल.
दामू नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष
मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात गावडे यांचा आरोप दुर्दैवी. एका मंत्र्याने असे विधान करणे चुकीचे. या सगळ्याची दखल केंद्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. उगाच हवेत बाण मारण्याऐवजी जर काही वस्तुस्थिती असेल तर ती त्यांनी मांडली पाहिजे.
सदानंद शेट तानावडे, माजी प्रदेशाध्यक्ष
गावडे यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलले पाहिजे होते असे सांगून ते म्हणाले, मी आदिवासी कल्याणमंत्री असताना कार्यालय सुसज्ज केले, अनेक योजना सुरू केल्या. गावडे यांनी नंतर त्यात कोणती भर घातली याची मला कल्पना नाही.
रमेश तवडकर, सभापती
गोवा सरकारात भ्रष्‍टाचार ही नित्‍याची बाब झाली असून आता त्‍या विरोधात या सरकारातील मंत्रीही बोलू लागले आहेत. गोविंद गावडे हे सरकारात मंत्री असल्‍यामुळे या सरकारात भ्रष्‍टाचार कसा चालू आहे हे त्‍यांना निश्चितच माहीत आहे. या सरकारातील कित्‍येक भ्रष्‍टाचाराच्या प्रकरणावर मी स्‍वत: आवाज उठवलेला आहे. हा भ्रष्‍टाचार कमी करण्‍यासाठी मुख्‍यमंत्र्यांनी ठोस पावले उचलण्‍याची गरज आहे किंवा स्‍वत:चे सरकार भ्रष्‍ट आहे हे तरी त्‍यांनी मान्‍य करावे,
विजय सरदेसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT