Govind Gaude |Goa News   Gomantak Digital Team
गोवा

Govind Gaude : तवडकर आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत

सडेतोड नायक : कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली दिलखुलास उत्तरे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : आदिवासी समाजाच्‍या भल्‍यासाठी, प्रगतीसाठी मी मंत्री या नात्‍याने सदैव कटिबद्ध आहे. रमेश तवडकर आणि माझ्‍यात कोणतेही मतभेद नाहीत. तवडकरांना मी आपला मोठा भाऊ मानतो, असे कला व संस्‍कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात गुरुवारी त्‍यांनी एसटी राजकीय आरक्षणापासून अन्‍य विषयांवर भाष्‍य केले.

गावडे म्‍हणाले, पुढील ५ वर्षांत राजकीय आरक्षण मिळेल याची मला खात्री आहे. प्रकाश वेळीप हे खूप ज्येष्ठ असून त्यांनी एसटी समाजाच्या भल्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. जे लोक प्रकाश वेळीप यांच्यावर टीका करत आहेत ते त्यांच्या वैयक्तिक स्‍वार्थातून! उटा सर्वसमावेशक नसल्याचा आरोपही गावडेंनी नाकारला. आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या दोन तरुणांच्या प्रकरणाबाबत विचारले असता गावडे म्हणाले, की या प्रकरणाबाबत न्यायालयात अपील करण्यासाठी आम्ही राज्य सरकारवर दबावही आणला आहे. या प्रकरणी न्यायालयात अपील करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य होते.

मी सदैव एसटी समाजाच्या पाठीशी

कला आणि संस्कृती विभागात सुमारे १८५ नोकऱ्यांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही सर्व पदे भरण्यात आली असून कोणताही अनुशेष शिल्लक नाही. भाजप सरकारच्‍या कार्यकाळातच आम्हाला एसटीचा दर्जा मिळाला आहे, हे एसटी समाजातील सालसेत येथील जनतेला सांगायचे आहे, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले. वैद्यकीय विभागातील बहुसंख्य एसटी राखीव जागा सालसेतमधून एसटी समाजाला मिळाल्या आहेत. या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एसटी समाजाच्या पाठीशी मी सदैव आहे.

आदिवासी कल्याण खाते त्या समाजाकडेच हवे

आदिवासी कल्याण खाते मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यामागे काही राजकारण आहे का? असा सवाल केला असता गावडे म्हणाले, ‘मला माहीत नाही, हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारावा. माझ्या कारकिर्दीत मी कोणाचे पाय खेचले नाहीत आणि भविष्यातही तसे करणार नाही. माझ्या मते हा विभाग आदिवासी समाजातील व्यक्तीला द्यायला हवा म्हणजे तो त्या समाजाला न्याय देईल.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT