पणजी: राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता.
राज्यपाल रविवारी सायंकाळी उशिरा दिल्लीत पोचले. त्यानी दिल्लीतील युद्धस्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. तेथील वहीवर त्यांनी आपला संदेशही नोंद केला.
राज्यपाल विजयनगर या राजघराण्याचे वारस आहेत. विजयनगरचे शेवटचे राजे या पुस्तकात घराण्याचा वारसा व इतिहास चित्रीत करण्यात आला आहे.
राज्यपालांनी दिल्ली भेटीत या पुस्तकाच्या प्रती मान्यवरांना आवर्जून भेट दिल्या. विशेष म्हणजे या पुस्तकाची प्रत पंतप्रधानांनी या भेटी दरम्यान आपल्याच हाती ठेवली होती. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
नंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली. ते केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री असताना त्यांचा मित्र परिवार दिल्लीत निर्माण झाला होता. त्यांच्या खासगी भेटी या दौऱ्यादरम्यान ते घेणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.