Goa governor PS Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

गोवा राज्यपालांकडून डायलेसीससाठी अर्थसाहाय्य

काणकोण दौरा: गोव्यातील देवालयांवर पुस्तक काढण्याचा मनोदय केला व्यक्त

दैनिक गोमन्तक

काणकोण: गोवा संपूर्ण यात्रा कार्यक्रमाअंतर्गत काणकोण तालुक्यातील 25 मूत्रपिंड रूग्णांना डायलेसीससाठी आर्थिक मदतीचे धनादेश राज्यपाल श्रीधन पिल्लई यांनी आज दिले.पंतप्रधानाच्या 71 वाढदिवसानिमित्ताने राज्यातील लोकांना भेटून पीडितांना आर्थिक मदत देण्याचे ठरविले होते. त्यावेळी ही संख्या 71 वर मर्यादित ठेवण्यात आली होती, मात्र आता पर्यत 200 डायलेसीस रूग्णांना आर्थिक मदत दिल्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शंभर पेक्षा जास्त संस्थांना आर्थिक मदत दिली आहे.

या आर्थिक मदतीच्या वितरणासाठी श्रीस्थळ पंचायत सभागृहात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोव्यातील देवालयांचा अभ्यास करून त्याच्या संदर्भात लवकरच हिंदी, इंग्रजी व अन्य भाषांत पुस्तक तयार करण्याचा मनोदय राज्यपालांनी श्री परशुराम देवालयाला भेट दिल्यावेळी व्यक्त केला. गोव्याचा खरा चेहरा ग्रामीण भागात आहे. राज्याची खरी ओळख व संस्कृती ग्रामीण भागात वसली आहे.त्या ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धन होण्याची गरज राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी श्रीस्थळ पंचायत सभागृहात बोलताना सांगितले.

येथील सरपंच व पंच यांच्याशी संवाद साधत राज्यपालांनी त्याच्या गावच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी सरपंच व पंचानी पंचायत क्षेत्रातील काही मोजक्याच समस्या मांडल्यात. ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत काणकोणसह राज्याचा विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सभापतीनी सांगितले. श्री मल्लिकार्जुन देवालयात देवालयाचे नूतन अध्यक्ष विठोबा देसाई व माजी अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी राज्यपालांचे स्वागत करून त्यांना समई प्रदान केली. यावेळी राजेंद्र देसाई यांनी राज्यपालांना देवालयाचा 1880 सालचा दस्तावेज दाखवला. यावेळी देवालय समितीचे सचिव राजेंद्र भगत, मुख्यत्यार प्रमोद नाईक गावकर, माजी अध्यक्ष अनिल नाईक गावकर, त्याचप्रमाणे उल्हास देसाई, प्रशांत देसाई, भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, दिवाकर पागी, हेमंत नाईक गावकर व अन्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT