Goa Governor and Lalu Yadav Dainik Gomantak
गोवा

कधी काळी लालू भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनाचे नायक होते, पण आज... गोवा राज्यपालांचा टोला

दैनिक गोमन्तक

Goa Governor's At Lalu Yadav: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद (Lalu Prasad Yadav) यांना अलीकडेच चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) यांनी त्यावर भाष्य केले आहे. "1970 च्या दशकात राष्ट्रीय आणीबाणीच्या विरोधात आंदोलनाचे शिल्पकार जयप्रकाश नारायण (JP) यांचा आत्मा भ्रष्टाचार कधीही सहन करणार नाही." असे जेपी आंदोलनाची आठवण करून देताना पिल्लई म्हणाले.

लालूप्रसाद यादव यांचा खरपूस समाचार घेत ते म्हणाले, 'लालू एकेकाळी भारतीय भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे चॅम्पियन म्हणून ओळखले जात होते, पण आता ते तुरुंगात आहेत. दुसरीकडे, गोव्याचे राज्यपाल केंद्राचे कौतुक करताना केंद्र सरकारची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे गेल्या 80 महिन्यांत या सरकारच्या एकाही सदस्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत."

न्यायालयाने पाचव्यांदा दोषी ठरवले

एएनआयशी बोलताना पिल्लई म्हणाले, "सकाळी मी एक वर्तमानपत्र वाचले ज्यामध्ये दोन तरुणींना त्यांच्या शारीरिकदृष्ट्या विकलांग आईला मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी हात धरून घेऊन जाताना दाखवण्यात आले होते. ते गोव्यातील मतदारांची शक्ती दर्शवते. लोकशाहीची ताकद दर्शवते. त्याच वृत्तपत्रात मला आणखी एक चित्र पाहायला मिळाले. त्या चित्रात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव लोकांच्या समुहासोबत फिरताना दिसत होते. त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने पाचव्यांदा दोषी ठरवले आहे. न्यायालयाच्या पाचही निकालांनी लालू प्रसाद यांनी केलेल्या जनतेच्या पैशाची लूट उघडकीस आणली आहे."

100% यशस्वी लसीकरण

राज्यपालांनी 100 टक्के कोविड-19 (Covid-19) लसीकरण करण्यात गोवा राज्य यशस्वी झाल्याचेही अधोरेखित केले. आम्ही वैद्यकीय कर्मचारी, सरकारी अधिकारी आणि गोव्यातील लोकांच्या मदतीने राज्यात 100% लसीकरण (Vaccination) करण्यात यशस्वी झालो आहोत. कोविड-19 च्या तिसऱ्या टप्प्याचा प्रसार झपाट्याने कमी होत आहे आणि आम्ही सामान्य स्थितीत परतलो आहोत," असे पिल्लई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT