मैं दुनिया का सबसे भला आतंकी हूं...: अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी पलटवार करत म्हटले की 'मी जनेतेसाठी हॉस्पीटलची उभारणी करतो.'

Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी चार दिवसांनी मतदान होणार आहे. तत्पूर्वी भाजप, काँग्रेस, आप, अकाली दल या प्रमुख पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) म्हणाले की, 'अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे खलिस्तानचे समर्थक आहेत, सत्तेसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो.' याच पाश्वभूमीवर आता अरविंद केजरीवाल यांनी पलटवार करत म्हटले की 'मी जनेतेसाठी हॉस्पीटलची उभारणी करतो.' (Arvind Kejriwal said I am best terrorist in world)

दरम्यान, आपल्यावरील आरोपांवर आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर नुकत्याच केलेल्या गंभीर आरोपांवरुन विरोधकांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. याप्रकरणी केजरीवाल यांनी आपली बाजू मांडली आहे.


Arvind Kejriwal
केजरीवाल म्हणाले, 'पंजाबचा CM बनलो नाहीतर, खालिस्तान PM बनेन'

केजरीवाल म्हणाले, 'ते मला दहशतवादी म्हणतात, मी जगातील असा एकमेव दहशतवादी आहे, जो हॉस्पिटल बनवतो.' यामध्ये आमचा काय दोष? आम्ही शिक्षण, आरोग्य, वीज, दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्येही देऊ.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com