साळावली धरण परिसराचा कुटुंबियांसमवेत आनंद लुटताना राज्यपाल सत्यपाल मलिक. 
गोवा

राज्यपाल मलिक यांची दुसऱ्यांदा साळावली धरणाला कौटुंबिक भेट

मनोदय फडते

सांगे
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अठरा दिवसांत दुसऱ्यांदा साळावली धरणाला कौटुंबिक भेट देऊन किमान तासभर आनंद लुटला. ही भेट खासगी स्वरूपात असल्याने कोणालाही आगाऊ कल्पना देण्यात आली नव्हती. 
यापूर्वी राज्यपाल ३१ जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निर्देशानुसार, साळावली धरण परिसरात भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा केली होती. आपण परत सप्टेंबर महिन्यात एक दिवस वास्तव्य करण्यासाठी साळावली परिसरात येणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले होते. पण, साळावलीचा मोह राज्यपालाच्या कुटुंबियांना आवरता न आल्याने अवघ्या अठरा दिवसांत दुसऱ्यांदा राज्यपालांनी साळावली धरण परिसराला भेट दिली. 
धरणावरून किमान अर्धा तास जलाशयाचा नेत्रसुखद नजारा लुटला. उंचावरून पडणाऱ्या पाण्यातून उडणारे मनमुराद तुषार राज्यपालांच्या कुटुंबीयांनी मनसोक्तपणे अंगावर झेलले. त्यानंतर हा लवाजमा धरणाच्या खालच्या भागात जाऊन उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह जवळून न्याहाळला. किमान तासभर धरण परिसरात राज्यपाल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आनंद लुटला. यावेळी जिल्हाधिकारी अजित रॉय, सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर, जलसंपदा खात्याचे अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल साळावलीत येणार म्हणून सकाळपासून सांगेचे पोलिस निरीक्षक सचिन पन्हाळकर, वाहतूक पोलिस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

संपादन ः संदीप कांबळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

IND vs SA ODI Series: द. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर; रोहित- विराट खेळणार की नाही? नव्या कर्णधाराचीही घोषणा

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

SCROLL FOR NEXT