problem of water in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सरकारी पाण्याची दिवसाढवळ्या चोरी

सरकारला लाखो रुपयांचे नुकसान

दैनिक गोमन्तक

केपे: कुडचडे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी खामामळ-कुडचडे येथे फिलिंग पॉईंट उभारण्यात आला आहे. या पॉईंटजवळ संबंधित खात्यातर्फे कोणाचीच नियुक्ती न केल्याने पाण्याची दिवसाढवळ्या चोरी होत असल्याने सरकारला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने फिलिंग पॉईंट ओसाड सोडल्याने जो तो येऊन टँकरद्वारे पाणी चोरून नेत असल्याने सरकारी तिजोरीला लाखोंचा फटका बसत आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले. आज सायंकाळी कुडचडे येथे एक टँकर ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला कलंडला. त्यातून ट्रकचालक बचावला, त्यावेळी त्याला विचारले असता टँकरद्वारे सांडपाणी प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करण्यात येत असून, हे पाणी खामामळ येथून आणले जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र तेथे उपस्थित असलेल्या कंत्राटदाराच्या अभियंत्याने हे पाणी प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सुमारे 60 कामगारांसाठी नेण्यात येत असल्याचे सांगितले. त्यासाठी पैसेही दिले जात असून ते पैसे कोणाला दिले जातात, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT