Mining In Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: पूर्वीच्या लीजधारकांना द्यावे लागणार 'अतिरिक्त शुल्क'! खाण क्षेत्राबाबत सरकारने घेतला नवा निर्णय

Goa Government: राज्यातील खाण क्षेत्रातील डंप हाताळण्यास परवानगी देताना पूर्वीच्या खाण लीजधारकांकडून रॉयल्टी व इतर शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क (प्रीमियम) आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

State Imposes Additional Fee on Former Mine Owners for Dump Management

पणजी: राज्यातील खाण क्षेत्रातील डंप हाताळण्यास परवानगी देताना पूर्वीच्या खाण लीजधारकांकडून रॉयल्टी व इतर शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क (प्रीमियम) आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासंदर्भातची माहिती खाण व भूगर्भ खात्याचे संचालक नारायण गाड यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे गोवा फाऊंडेशनने राज्याच्या डंप हाताळणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलेल्या याचिकेला अनुसरून दिली आहे.

तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त शुल्क आकारण्याचे धोरण सर्व बाबींचा विचार करूनच तयार करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी डंप खासगी जमिनीवर आहेत व त्याचा लीजधारकाने जमीन महसूल संहितेच्या कलम ३३ (१ए) नुसार दंड जमा केला आहे. २०१३ धोरणानुसार रूपांतरण शुल्क जमा करण्यात आले आहे व पाच वर्षांच्या आत खाण योजनेनुसार डंप काढण्यात आला आहे किंवा अधिसूचित केल्याप्रमाणे व सर्व वैधानिक आवश्‍यकतांच्या पूर्ततेनुसार पुढील कालावधी पूर्ण केला आहे.

या अटी पूर्ण केलेल्या लीजधारकाला डंप काढण्यास परवानगी दिली जाणार आहे, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. सरकारने तयार केलेले धोरण हे सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशी व सूचनांशी सुसंगत आहे. यामध्ये सर्व पैलूंचा विचार करण्यात आल्याने अशा धोरणात कोणताही दोष आढळू शकत नाही. त्यामुळे ही याचिका कोणत्याही गुणवत्तेशिवाय आहे.

शिल्लक रक्कम खनिज मालकाला

खनिज उत्खननाची सरासरी किंमत लीजधारकांना देण्यात येईल व इतर काही रक्कम वेगळ्या शीर्षकाखाली तर शिल्लक रक्कम खनिज मालकाला दिली जाईल. डंपसंदर्भात सरकारकडून जप्तीचे आणि विनियोगाचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञ समितीला खाणकाम कशाप्रकारे हाताळले जाईल याचा अहवाल सहा महिन्यांत सादर करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार १२ एप्रिल २०१५ पर्यंत वेळ देण्यात आला होता, असे खात्याचे म्हणणे आहे.

लीज क्षेत्राबाहेर खनिज डंपिंगला परवानगी नाही

सर्वोच्च न्यायालयाने गोवा फाऊंडेशनच्या याचिकेत दिलेल्या निवाड्यात नूतनीकरणाचा कालावधी २२ नोव्हेंबर २००७ मध्ये संपला आहे, त्यामुळे त्यानंतर नूतनीकरण केलेली खाण लीजेस बेकायदेशीर होतात. लीज क्षेत्राबाहेर खनिज डंपिंग करण्यास परवानगी नाही, हे देखरेख समितीने खनिज ई-लिलाव केलेल्या प्रमाणांचा संदर्भ घेत केलेल्या निरीक्षणात नोंद केले आहे, असे गाड यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT