Accident Death In Goa Dainik Gomantak
गोवा

Accident Death In Goa: आयुषच्या कुटुंबाला सरकारने आर्थिक मदत द्यावी

Accident Death In Goa: मडकईकरांची मागणी: ‘मानवाधिकार'ची नोटीस, महानगरपालिकेचे ‘स्मार्ट सिटी’ला पत्र

दैनिक गोमन्तक

Accident Death In Goa: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत मलनिस्सारण वाहिनीसाठी निर्माण होत असलेल्या चेंबरमध्ये पडून सोमवारी पहाटे मृत्यू पावलेल्या आयुष हळर्णकर याचा मृत्यू झाला. कंत्राटदार आणि सल्लागार सुरक्षेचे उपाययोजना करण्यात अयशस्वी झाल्यामुळे पिडीत कुटुंबाला एक कोटी रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली आहे.

सरकारच्या निष्काळजीपणामुळे झालेला अपघात आहे, अपघातात जीव गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी यंत्रणा कशी हलली, वीज खात्याने तत्काळ दिवे लावले, पोलिस रिफ्‍लेक्टर लावण्यास कसे धावले? हे सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे युवकाच्या मृत्यूला सर्वस्वी कंत्राटदार आणि सल्लागारास जबाबदार धरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत मुख्यमंत्र्यांनी पिडीत कुटुंबास आर्थिक मदत मिळवून द्यावी, असेही मडकईकर म्हणाले.

आयुष याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन कंत्राटदार व सल्लागार यांनी ज्या उपाययोजना करावयाच्या होत्या, त्या न करता काम करीत असल्याचे निदर्शनास आणून देणारा व्हिडिओ व्हायरल केला होता

. त्याचबरोबर रस्त्याचे काम सुरू असताना मिक्सरसारखे साहित्य रस्त्यावर ठेवणे योग्य नाही, अंधाराची कल्पना असतानाही संबंधित कंत्राटदाराने किमान ज्या उपाययोजना करावयाच्या होत्या, त्या करायला हव्या होत्या, त्या केल्या नाहीत असा आरोप त्यांना केला होता.

याबाबत जनतेच्या तीव्र संताप लक्षात घेऊन मानवाधिकार'तर्फे नोटीस देण्यात आली असून महानगरपालिकेचे ‘स्मार्ट सिटी’ पत्र लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT