Bhoma Road, Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Bhoma Road: ऐतिहासिक मंदिरांना हात लावू नका, रस्‍ता आराखड्यात बदल करा; भोम महामार्गाबाबत सरदेसाईंची मागणी

Vijai Sardesai: राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या आराखड्यात बदल करून यासाठी नवीन जागा शोधावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.

Sameer Panditrao

मडगाव: भोम येथील सातेरी आणि महादेव ही दाेन्‍ही मंदिरे जुनी आणि ऐतिहासिक स्‍वरूपाची आहेत. त्‍यामुळे या दोन्‍ही मंदिरांना हात न लावता सरकारने भोम येथील राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या आराखड्यात बदल करून यासाठी नवीन जागा शोधावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.

राष्ट्रीय महामार्ग ४अ च्या विस्तारामुळे बाधित झालेल्या भोम गावातील स्थानिकांच्या एका शिष्टमंडळाने माजी मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांच्या शतकानुशतके जुन्या मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी महामार्गाच्‍या जागेत बदल करण्‍याच्‍या मागणीला पाठिंबा मागितला.

बैठकीनंतर जारी केलेल्या एका निवेदनात सरदेसाई यांनी गोव्यातील भाजप सरकारवर अाराेप करताना या सरकार गोव्‍यातील मंदिर वारसा नष्‍ट करण्‍याची जणू मोहीम हाती घेतली आहे. पर्वरी येथील जुने मंदिर उध्‍वस्‍त केल्‍यानंतर आता हे सरकार भोमामधील ऐतिहासिक महत्‍वाची सातेरी आणि महादेव मंदिरे पाडण्याची योजना आखत आहे अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

या दोन्‍ही मंदिरांचे रक्षण करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा हे या आधी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वैयक्तिकरित्या पटवून दिले होते, परंतु राज्य सरकार त्‍यावर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे.

गावकऱ्यांच्या मते, एक मंत्री आता मंदिराचा किती भाग अबाधित ठेवायचा हे ठरवत आहे याबद्दल सरदेसाई यांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त करताना, मंत्री मंदिरांच्या सीमा का ठरवत आहेत?

महामार्गाजवळ त्यांची जमीन आहे आणि ते रिअल इस्टेटमधून नफा मिळवू इच्छितात म्हणून का?” असा सवाल केला. मंदिरे वाचविण्‍यासाठी या रस्‍त्‍याचा आराखडा बदलावा ही गावकऱ्यांची मागणी योग्‍य असून गावकऱ्यांच्‍या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे आणि त्‍यांना न्‍याय मिळावा यासाठी मी सर्वतो प्रयत्‍न करेन, असे आश्‍वासन सरदेसाई यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनिवारी चमकणार नशीब! 'या' राशींसाठी दिवस ठरणार खास; नोकरीत यश, व्यवसायात भरभराट आणि आर्थिक लाभाचे संकेत

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

SCROLL FOR NEXT