Honda Panchayat Sonshi Dainik Gomantak
गोवा

Honda Panchayat: खाण कंपनीच्या अतिक्रमणाने शाळेकडे जाणारा रस्ताच गायब; सोनशी ग्रामस्थांची रस्त्याची मागणी

Sonshi Village: खाण कंपनीच्या गाड्यांचा वावर वाढल्यामुळे रस्ता उद्‍ध्वस्त

गोमन्तक डिजिटल टीम

पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रातील सोनशी गावातील सरकारी प्राथमिक शाळेकडे जाणारा रस्ता एका खाण कंपनीच्या कामकाजामुळे अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दररोज शाळेत जाणाऱ्या मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी होंडा पंचायतीने लक्ष घालून त्वरित रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी सोनशी भागातील नागरिकांनी काल होंडा पंचायतीच्या ग्रामसभेत केली.

सरपंच शिवदास माडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच रेशम गावकर, पंच स्मिता मोटे, निलीमा शेट्ये, प्रमोद गावडे, दीपक गावकर, सुशांत राणे, नीलेश सातार्डेकर, कृष्णा गावकर, पंचायत सचिव मुला वरक व गटविकास कार्यालयातून निरीक्षक म्हणून दिनेश माईणकर उपस्थित होते.

यावेळी सरपंच शिवदास माडकर यांनी उपस्थित ग्रामस्थांचे स्वागत करून सभेला सुरवात केली, तर सचिव मुला वरक यांनी मागील सभेचा वृत्तांत व सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा जमा खर्च सादर करून मान्यता घेतली.

यावेळी सोनशी भागातील नागरिकांनी गावातील सरकारी प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका खाण कंपनीने अतिक्रमण करून संपूर्ण रस्ता गायब झाला असल्याचे पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी स्थानिक पंच प्रमोद गावडे यांनी रस्ता केणी नामक खाण कंपनीच्या कामकाजामुळे गायब झाला असल्याने विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले. सरपंच शिवदास माडकर म्हणाले, रस्त्यासंबंधी पंचायत तातडीने कारवाई करून विद्यार्थ्यांची अडचण दूर करणार आहे.

महिला समितीची स्थापना

महिला आयोगाकडून आलेल्या पत्रावर या ग्रामसभेत चर्चा होऊन पंचायत पातळीवर महिलांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी महिला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीसाठी काही समाजसेवी महिलांची नावे घेण्यात आली आहेत, परंतु यासंबंधीची अधिकृत समिती काही दिवसांनी जाहीर करण्यात येणार असल्याचे सरपंच शिवदास माडकर यांनी सांगितले. उपसरपंच रेशम गावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT