Honda News: होंडा येथील गोदामांचे दुरुस्तीकाम सुरू

Goa Warehouses Roof Blown Off Case: गोदामातील धान्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे
Goa Warehouses Roof Blown Off Case: गोदामातील धान्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे
Honda Godown Dainik Gomantak
Published on
Updated on

वादळी पावसामुळे ७ रोजी उडून गेले होंडा येथील नागरी पुरवठा खात्याच्या दोन्ही गोदामाच्या छप्पराची तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

गोदामाच्या छप्पराचा काही भाग उडून गेल्यामुळे पावसाचे पाणी थेट गोदामात शिरत होते. त्यामुळे त्या ठिकाणी असलेला सुमारे तेरा टन गहू भिजून खराब झाला. नागरी पुरवठा खात्याने याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविल्यानंतर सोमवारी सकाळी फोंडा व वाळपई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोदामांचे सर्वेक्षण केले.

यावेळी वाळपई नागरी पुरवठा खात्याचे निरिक्षक राजेश आर्लेकर यांनी सांगितले की, छप्पर उडून गेल्याने इमारतीचे किती नुकसान झाली याचा अंदाज काढण्यात येणार आहे. सध्या गोदामातील गहू सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 80th Anniversary DR Ram Manohar Lohia
Goa Forest Department reservation for disabled
 Goa Fertilizer Shortage
Goa Water Tanker Registration Confusion
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com