CM Pramod Sawan Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: गोविंद गावडेंना आणखी एक धक्का; मुख्यमंत्र्यांनी हाती घेतली कला अकादमीची सूत्रे, अध्यक्षपदी निवड

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे कला अकादमीच्या अध्यक्षपदाचा ताबा देणारा आदेश कला व संस्कृती संचालक सगुण वेळीप यांच्या सहीने आज जारी करण्यात आला.

Sameer Amunekar

Kala Academy Goa

पणजी: कला अकादमीच्या अध्यक्षपदावरून अखेर आमदार गोविंद गावडे यांना सरकारने हटवले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे कला अकादमीच्या अध्यक्षपदाचा ताबा देणारा आदेश कला व संस्कृती संचालक सगुण वेळीप यांच्या सहीने आज जारी करण्यात आला.

कला अकादमीवरील गावडे यांच्या समितीची मुदत प्रत्यक्षात ३० एप्रिल रोजी संपली होती. मात्र, नवी समिती न निवडली गेल्याने गावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच कार्यरत होती. गोमन्त विभूषण पुरस्काराच्या निमित्ताने कला अकादमीत आलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी कला अकादमीच्या अध्यक्षपदी कोण, अशी विचारणा केली होती.

त्यावेळी ‘आता मुख्यमंत्र्यांकडे अध्यक्षपद’ असे उत्तर त्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नवा अध्यक्ष नेमला गेलेला नाही आणि समितीच्या नियुक्तीबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही, असे वृत्त ‘गोमन्तक’ने दिले होते. त्याची दखल घेत आज मुख्यमंत्र्यांकडे कला अकादमीच्या अध्यक्षपदाचा ताबा देणारा आदेश कला व संस्कृती संचालक सगुण वेळीप यांच्या सहीने जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार गोविंद गावडे म्हणाले, की कोणतीही माहिती न घेता ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे म्हणणारे दामू यांच्यावर माझ्यावर झालेल्या कारवाईच्या न्यायाने शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

माझ्यावर जर कारवाई होते तर ‘सर्वांनाच समान न्याय’ या तत्त्वानुसार त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. मी भाजपचा कार्यकर्ता, आमदार आणि मंत्री असताना ते विधान केले होते. शिस्तभंगाची भाषा वापरणाऱ्या दामू यांनी स्वयंशिस्त अवलंबण्याची गरज आहे. दामू त्यावेळी नागपूरला होते.

आता तरी शांती लाभली का?

गावडे म्हणाले, फोंड्यातील माझ्या भाषणातील शब्द फिरवून संदेश पाठवला गेला. माझ्या भाषणावर मी आजही ठाम आहे. शब्द फिरवणाऱ्यांना मला विचारायचे आहे, आता तरी (मंत्रिपद काढून घेतल्यानंतर तरी) तुम्हाला शांती लाभली आहे का?

चौकशी न करताच माझ्यावर केली कारवाई

वर्तमानपत्रांनी मात्र मुख्यमंत्र्यांवर मी आरोप केल्याचे छापून आणले. खात्यात काय चालते, हे मुख्यमंत्र्यांना ठाऊक असणे शक्य नाही. त्यांना त्याची जाणीव करून देणे गरजेचे असते, म्हणून मी तसे बोललो. कोणी असा जाहीर आरोप केला तर त्याला बोलावून आणायचे असते, चौकशी करायची असते. तशी चौकशी झाली नाही, असे गावडे म्हणाले.

पुन्हा सारवासारव

आम्ही काय करतो, कोणत्या तरी कंत्राटदाराच्या फाईली नेतो. श्रमशक्ती भवनच्या खाली त्यांच्याकडून काहीतरी घेऊन त्यांना फाईली नेऊन देणे हे सध्या काम सुरू आहे, असे विधान गावडे यांनी फोंडा येथील प्रेरणा दिन कार्यक्रमात केले होते. तसे विधान केल्याचे मान्य करतानाच मी कुठेही भ्रष्टाचार, गैरव्यवहार हा शब्द वापरलेला नाही, अशी सारवासारव त्यांनी आज केली. मी मुख्यमंत्र्यांचे नाव घेतलेले नाही, असाही पुनरूच्चार गावडे यांनी केला.

प्रियोळचे आमदार तथा माजी मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटविल्यानंतर पहिला धक्का बसला. त्यानंतर ते सावरत असतानाच त्यांचे समर्थक असलेल्या खांडोळाच्या सरपंच-उपसरपंचांवर अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला. गुरुवारी या सरपंचांची उचलबांगडी झाली, तर सोमवारी उपसरपंचांवरील अविश्‍वास ठरावावर चर्चा होणार आहे. असे एका पाठोपाठ धक्के बसत असतानाच कला अकादमीवरूनही त्यांना हटविले.

दामूंवर कारवाईची मागणी

भाजपचे पदाधिकारी माझ्याविरोधात वावरतात, असा आरोप करणारे आमदार गावडे यांनी आज थेट प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर शरसंधान साधले. चौकशी न करताच माझ्यावर कारवाई होते, तर त्याच न्यायाने चौकशी न करता ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ म्हणणाऱ्या प्रदेशाध्यक्षांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी आज मुलाखतीत केली.

मग आदिवासी भवन का बांधले नाही?

१ बिरसा मुंडा यात्रेने आदिवासी समाजाला काय मिळाले, अशी विचारणा करून मी सभापती रमेश तवडकर यांना लक्ष्य केलेले नाही.

२ ती संकल्पना कोणाची, हे अद्याप मला माहीत नाही. मीच त्यांचे मतदारसंघात स्वागत केले. मंदिरात गाऱ्हाणे घालून घेतले.

३ तवडकर आणि मी एकाच ताटात जेवणारे. आदिवासी भवनसाठी हातातून गेलेली जमीन परत मिळवली. सेरूला कोमुनिदादला आक्षेप मागे घ्यायला लावले.

४ आज आदिवासी कल्याण खात्याच्या नावावर जमीन आहे. गोमंतक गौड मराठा समाजाकडे बांधकाम परवाना आहे.

५ अडीच लाख शुल्क भरले आहे. मग आदिवासी भवन उभे का राहात नाही, असा प्रश्न त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT