Goa Tourism Visitors Report
पणजी: राज्य सरकारने यावर्षीच्या नऊ महिन्यांचा पर्यटन अहवाल जारी करून ७१.८४ लाख पर्यटक गोव्यात आल्याचे जाहीर केले आहे. परंतु नव्या हंगामाच्या प्रारंभी पर्यटक संख्या घटली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ती घट ५० टक्के असल्याचा दावा गोवा शॅकमालक संघटनेने आणि टीटीएजीतर्फे केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून गोव्यातील पर्यटनामध्ये घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी यासंदर्भात काही महत्त्वाची निरीक्षणे मांडली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॅक व्यवसायात ५० टक्के घट झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्के पर्यटक गोव्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सध्या गोव्यात येणारे पर्यटक प्रामुख्याने इव्हेंट-आधारित पर्यटनासाठी येत आहेत. विविध हॉटेल्स इव्हेंट्स आयोजित करतात आणि त्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होतो. मात्र, या पर्यटकांचा शॅकवर येण्याचा कल कमी आहे. पारंपरिक पर्यटनासाठी येणारे पर्यटकच शॅकवर येतात आणि हे पर्यटक कमी झाल्याने शॅक मालकांच्या उत्पन्नात घट होत आहे. यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे, असे कार्दोज यांनी सांगितले.
टीटीएजी अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी सांगितले, की राज्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत होते. मात्र, आता अचानक उड्डाणाची रक्कम वाढल्याने पुढील बुकिंग कमी झाले आहेत. त्यामुळे पर्यटक ५० टक्के कमी झाले या दाव्याला आम्ही सहमत आहोत. त्यातही राज्यातील रस्ते चांगले नसल्याने पर्यटक नाराज होऊन निघून जातात. सरकारने यावर गंभीर विचार करून रस्ते हॉटमिक्स करणे आवश्यक आहे. १८ डिसेंबरनंतर पर्यटकांमध्ये खूपच घट दिसून आली आहे.
ब्रिटनहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय घटली आहे. त्याऐवजी रशियाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे, परंतु एकूणच पर्यटनातून होणारा व्यवसाय पूर्वीइतका फायदेशीर राहिलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.