Portuguese Destroyed Temples Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Temples: पोर्तुगीजांनी उद्धवस्त केलेल्या 'त्या हजारो मंदिराचं स्मारक' अजून का रखडतंय?

Portuguese Destroyed Temples: सर्व मंदिराचं मिळून एकाच स्मारक मंदिर उभं राहणार होतं, मात्र सरकारी पातळीवर अजूनही ही प्रक्रिया सुरु झालेली नाही.

Akshata Chhatre

Portuguese Destroyed Temples of Goa

पणजी: गोव्याला लागलेली दृष्ट म्हणजे पोर्तुगीज. पोर्तुगीज १५१० साली गोव्यात आले आणि गोव्यातील जीवन उद्धवस्त करायला सुरुवात केली. त्यांना गोव्यात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायचा होता आणि म्हणून त्यांनी गोव्यातील जुनी संस्कृती मिटवून टाकण्यासाठी हिंदू धर्म मिटवून टाकण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यामध्ये खास करून मंदिरं उद्धवस्त करण्याचा प्रकार घडायचा.

तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या तीन तालुक्यांमध्ये पोर्तुगीजांची राजवट होती आणि म्हणूनच हिंदू मंदिरांचं रक्षण करण्यासाठी मंदिरं इतर ठिकाणी हलवण्यात आली होती. जी मंदिरं स्थलांतरित झाली ती आज पाहायला मिळतात मात्र जी मंदिरं पोर्तुगीज राजवटीचा भाग होती त्यांना पोर्तुगीजांनी कायमचं मिटवलं.

गोवा राज्य सरकारने उद्धवस्त केलेली मंदिरं पुन्हा उभी करण्याचं आश्वासन अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलं होतं मात्र सरकार अद्याप काम करताना दिसत नाहीये. मंदिरं पुन्हा उभारण्यासाठी पैशांची तरतूद झाली असली तरीही अजून काम का सुरु झालेलं नाही असा प्रश्न कायम राहतो. पोर्तुगिजांनी एक हजारहून अधिक मंदिरं उद्धवस्त केली असण्याची शक्यता आहे आणि या सर्व मंदिराचं मिळून एकाच स्मारक मंदिर उभं राहणार होतं, मात्र सरकारी पातळीवर अजूनही ही प्रक्रिया सुरु झालेली नाही.

पुरातत्त्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी गोव्यातील एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीप्रमाणे काही कारणांमुळे मंदिरबांधणीची प्रक्रिया काही काळ लांबली आहे आणि यावर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लवकरच निर्णय घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT