Manish Jadhav
गोव्याचं खरं वैभव येथील मंदिरे आहेत. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
गोवा म्हटलं की आपण फक्त येथील समुद्रकिनारे, नाईटलाईफ, किल्ले, एवढचं मानून जातो. पण येथील मंदिरेही तुम्हाला साद घालतात. आज आपण अशाच एका मंदिराबद्दल जाणून घेणारोत.
गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून अवघ्या 40 कि.मी. अंतरावर असणाऱ्या दक्षिण गोव्यातील शिरोडा या गावात मंडलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
मंडलेश्वर मंदिर 8 व्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. शिरोडा गावातील द्वादश प्रमुख मंदिरांपैकी मंडलेश्वर हे सर्वांत प्राचीन आणि प्रथम मंदिर असल्याचे समजते.
मंडलेश्वर मंदिरानंतर माधवाचे मंदिर, महामाया देवीचे मंदिर आणि अन्य मंदिरे बांधल्याचे सांगितले जाते. यानंतर सर्वांत शेवटी म्हणजे 10व्या शतकात शिवनाथ मंदिर बांधण्यात आल्याचे समजते.
श्रावणात या मंदिरात रुद्राभिषेक, लघुरुद्र यांसारखे धार्मिक कार्यक्रम होतात. शिवपूजन आणि मंडलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात.