Goa Govt Youth Award Dainik Gomantak
गोवा

Goa Youth Award: गोवा सरकारचा 'युवा पुरस्कार'; कोठे कराल अर्ज, अंतिम मुदत जाणून घ्या

वैयक्तिक पुरस्कारासाठी 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवकांना अर्ज करता येईल.

Pramod Yadav

Goa Govt Youth Award: गोवा सरकार, क्रीडा आणि युवा कार्य संचालनालयाच्या वतीने 2021-22 आणि 2022-23 सालच्या राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. युवा विकास कार्याच्या क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था /महाविद्यालये/ युथ क्लब आणि स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागवले आहेत.

अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे.

वैयक्तिक पुरस्कारासाठी 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवकांना अर्ज करता येईल.

अर्जाच्या नमुन्यासह पात्रतेसंबंधित इतर नियम आणि अटी क्रीडा आणि युवक संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत. अर्जदारांना dsya.goa.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करता येईल.

पात्र युवक/स्वयंसेवी संस्था इत्यादींचे रीतसर भरलेले अर्ज, ज्या वर्षासाठी अर्ज केला जात आहे ते नमूद करून, कामाचे प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे 30 नोव्हेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी क्रीडा आणि युवक व्यवहार संचालनालय, काम्पाल, पणजी येथील कार्यालयात सादर करता येईल.

30 नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती माहिती आणि प्रचार विभागाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Dubai Flights: युद्धविरामानंतर मोठा निर्णय! बंद पडलेली गोवा–दुबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा

Goa Electricity: खासगी कंपनीला 'पॉवर' नाहीच, राज्य सरकारकडून स्पष्ट; खात्याकडूनच होणार वीज वितरण

Heavy Rain Bicholim: डिचोली बाजार संकुलाचे छप्पर उडाले; आत शिरले पाणी, व्यापाऱ्यांचे नुकसान; पालिकेविरोधात संताप

Porvorim Flyover: पर्वरी उड्डाणपूल सप्टेंबरमध्ये होणार खुला, अंतिम सेगमेंट बसविण्याचे काम पूर्ण; 641 कोटींचा प्रकल्‍प

Goa Crime: प्रेमासाठी बिहारहून थेट गोव्यात! प्रेयसीला पटवण्यात अपयश, संतापातून दाम्पत्यावर जीवघेणा चाकूहल्ला; आरोपी वेर्णा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT