Morjim Citizens Dainik Gomanmtak
गोवा

मोरजी टेंबवाडामधील पाण्याच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच!

सरकार (Government) एका बाजूने जनतेला निवडणुकीच्या तोंडावर मोफत पाणी पुरवठा करण्याची घोषणा करते. मात्र नागरिकाना मागच्या सहा महिन्यापासून नळाना पाणी येत नाही.

दैनिक गोमन्तक

मोरजी: सरकार (Government) एका बाजूने जनतेला निवडणुकीच्या तोंडावर मोफत पाणी पुरवठा करण्याची घोषणा करते. मात्र नागरिकांना मागच्या सहा महिन्यापासून नळाना पाणी येत नाही. त्याकडे स्थानिक आमदार अभियंते आणि सरकार यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ही स्थिती आहे टेंबवाडा मोरजी येथील आहे. मागील सहा महिन्यांपासून या भागातील नागरिकांना पाण्याची समस्या सतावत आहे. नागरिकांनी चतुर्थीपूर्वी स्थानिक आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांची भेट घेवून आपली कैफियत मांडली होती. त्यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी संबधित अधिकारी आणि पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सूचना देताना पाणी सुरळीत करण्याचे सांगितले होते. शशिकला मोरजे (Shashikala Morje) यांनी प्रतिक्रिया देताना मागच्या सहा महिन्यापासून लोकांच्या दारात रात्रो 3 नंतर जावून पाणी आणावे लागते, रस्त्याच्या बाजूला जी घरे आहे त्याना थोड्या प्रमाणात नळाचे पाणी येते. मात्र रस्त्यापासून जी दूर घरे आहेत त्या घराना नळाचा थेंब येत नाही.

आल्बर्ट फर्नांडीस (Albert Fernandes) या जागृत नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सरकारने पाण्याची अगोदर सोय करून नंतर मोफत पाण्याची घोषणा करावी. आमदार हे मतासाठी दारावर येतात आणि निवडून आल्यावर पाठ फिरवतात, सरकारला पाणी पुरवठा करायला जमत नाही तर राजीनामे देवून घरी बसा लोकांकडे आणि मत मागण्यासाठी येवू नका. पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर येत्या दोन दिवसात पाणी खात्यावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा दिला. यावेळी अनेक महिलांनी पाण्यासाठी कशी वणवण आणि जागरण करावे लागते याची माहिती दिली. येथील नागरिकांचे म्हणणे आहे कि काही भागात सुरळीत पाणी पुरवठा होतो तर काही भागात पाण्याचा थेंब नाही. हा मतभेद कश्यासाठी असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मांद्रे मतदारसंघात वेगवेगळ्या पंचायत क्षेत्रात लोकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. इथला पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे सोडून सरकार मात्र वेगळ्याच विकासाच्या बाता मारून लोकांना खोटी स्वप्ने दाखवत असल्याचा आरोप मगोचे नेते जीत आरोलकर यांनी केला आहे. मगो पक्षातर्फे मांद्रे मतदारसंघात व्यापक पाणी आंदोलन छेडणार आहे. पाणी टंचाईचा हा प्रश्न एकाच फटक्यात सोडविण्यासाठी सर्व पंचायत क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घ्यावा,असे आवाहन जीत आरोलकर यांनी यापूर्वीच केले आहे. त्यासाठी आता जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे .

पेडणे तालुक्याला चांदेल पाणी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. या प्रकल्पाकडे गेली अनेक वर्षे कुणी लक्षच दिले नाही. पेडणेत मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासह अन्य अनेक प्रकल्प होऊ घातले आहेत. तुये येथे वेगळा जल प्रक्रिया प्रकल्पाची योजना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आखली होती. विद्यमान आमदारांनी आणि या सरकारने ही योजना पुढे का नेली नाही याचे स्पष्टीकरण द्यायला हवे,असेही जीत आरोलकर (Jeet Arolkar) म्हणाले. लोकांना पाणी पुरवठा केला जात नाही आणि टॅकरचीही सोय केली जात नाही. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मांद्रेत भिषण पाणी संकट उभे राहते पण सरकारला याचे काहीच पडून गेले नाही,असा आरोप जीत आरोलकर यांनी केला आहे.

हर घर जल म्हणजे फसवणूक

राज्यातल्या सगळ्या घरांना नळाव्दारे पाणी देणारे गोवा हे देशातले पहिले राज्य आहे,अशी शेखी मिरवणारे सरकार पाणी टंचाईने ग्रस्त लोकांना काय जबाब देणार,असा सवाल जीत आरोलकर यांनी केला. मांद्रेचे आमदार या दाव्याबाबत काय सांगणार. पाणी टंचाईग्रस्त भागात आमदारांनी भेट देऊन येथील लोकांची समस्या जाणून घ्यावी. मुख्यमंत्र्यांना सांगावे की हर घर जल योजना ही आपल्या मतदारसंघात अपयशी ठरली आहे. पाणी, वीज, रस्ते या मुलभूत गरजा लोकांच्या आहेत. या गरजा पूर्ण न करता मोठ मोठ्या प्रकल्पांची घोषणा करून हे सरकार मांद्रेतील जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करीत आहे,असा आरोपही जीत आरोलकर यांनी केला.

पेडणे तालुक्यातील लाखभर लोकसंख्या असलेल्या जनतेला चांदेल येथील १५ एमएलडी पाणी प्रकल्पातून एकाच जलवाहिनीतून पूर्ण तालुक्याला वळसा घालत पाणी पुरवठा केला जातो . चांदेल पासून ३० पेक्षा जास्त किलोमीटरवर असलेल्या केरी , पालये , हरमल , मांद्रे , मोरजी , कोरगाव , आगरवाडा , पार्से तुये या भागात आजही जानेवारी महिन्यानंतरच पाण्याची टंचाई असते वळसा घालून जलवाहिनी येते ते पाणी पूर्ण गतीने नसल्याने त्या त्या गावात पाणी पुरवठा होत नाही. पेडणे तालुक्यात एका बाजूने पाण्याची टंचाई भासत आहे तर दुसऱ्या बाजूने तालुक्यात नवनवीन प्रकल्प होवू घातले आहेत , नवीन प्रकल्प , नवीन वस्त्या उभारण्याचे काम जोरात चालू आहे , मात्र पाण्याचे नियोजन नसताना लोकवसत्याना आणि प्रकल्पाना मान्यता मिळाली जाते . पूर्वी जाणकार पाण्याच्या ठिकाण पाहून लोक वस्त्या घरे उभारायचे आता का काळ बदलला आहे , घरे इमारती बंगले उभारून जाल्यानंतर पाण्याचा शोध घेतला जात आहे .

पेडणे चांदेल प्रकल्पातून दरदिवशी 15 एम एल डी पाणी सोडले जाते , त्यातील 5 एम एल डी नासाडी होते 2 ते 3 एम एल डी पाण्याची चोरी होते . 15 एम एल डी पाण्याची गरज पेडणेतील जनतेला असताना 7 ते 8 एम एल डी पाणी मिळते, पाण्याची आवक जास्त आहे पुरवठा मात्र कमी अशी स्थिती आहे . नवीन विस्तारित प्रकल्पाचे काम सध्या कासव गतीने चालू आहे. मांद्रे मतदार संघात पर्यायाने पेडणे तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे , ती समस्या सोडवण्यासाठी मांद्रे मतदार संघात स्वतंत्र 30 एमएलडी नवीन पाणी प्रकल्प तुये येथे उभारून हि समस्या सोडवली जाईल , त्यासाठी नागरिकांनी थोडी कळ सोसावी असे आवाहन मांद्रे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी टेंब वाडा मोरजी येथे किनारी भागात मिनी नाला बांधकाम शुभारंभ करतानाच पत्रकार आणि स्थानिक पंच सदस्य पवन मोरजे यांनी पाण्याची समस्या मांडळी , पत्रकारांनी तर काही नव्याने अधिकारी आले तेच पाणी पुरवठा करताना मतभेद करतात भलतीकडे व्होल फिरवून पाणी ठराविक परिसरात सोडतात असे आमदार सोपटे यांच्या निदर्शनात आणून दिले त्यानंतर आमदार दयानंद सोपटे यांनी पाणी समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याची ग्वाही दिली .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT