Divya Rane Gomantak Digital Team
गोवा

Valpoi News : सरकारी आरोग्य केंद्राचे रूप पालटले

वाळपईत रुग्णांना दर्जेदार सेवा : ग्रामीण भागात शिबिराच्या माध्यमातून जनजागृती

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई सरकारी आरोग्य केंद्राचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. आज वाळपईचे नवीन आरोग्य केंद्र रुग्णांसाठी नवसंजीवनीच ठरत आहे. वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी २००७ पासून लोकप्रतिनिधित्व हाती घेतल्यानंतर आजच्या काळात आरोग्य सेवा लोकोपयोगी ठरलेली आहे.

गेल्या पंधरा वर्षांत आरोग्य सेवा क्षेत्रात प्रचंड बदल घडून लोकांना चांगली वेळेत सेवा मिळते आहे. यामध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याबरोबरच केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे महत्त्वाचे योगदान लाभले आहे. वाळपई हे सत्तरीचे केंद्रबिंदू आहे.

नगरगाव, सावर्डे, खोतोडा, डोंगुर्ली-ठाणे, म्हाऊस अशा अनेक ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिशय दुर्गम भागातील लोकांना वाळपईचे आरोग्य केंद्र लाखमोलाचे ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांत सत्तरी तालुक्यातील बाराही पंचायत क्षेत्रांत व वाळपई नगरपालिका क्षेत्रात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. त्यामुळे ग्रामीण लोकांना जीएमसीमधील डॉक्टरांकडून तपासणी करून मिळाली आहे.

सॅटेेलाईट ओपीडी योजना

वाळपई ग्रामीण भागातील लोकांना प्रत्येकवेळी तपासणीसाठी बांबोळीतील गोमेकॉत जावे लागत होते. त्यासाठी आरोग्य खात्याने आरोग्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत वाळपई केंद्रात गोवा मेडिकल कॉलेजची सॅटेेलाईट ओपीडी योजना सुरू केली. गतवर्षी २२ जूनला त्याची सुरुवात केली आहे. दर बुधवारी, शुक्रवारी मेडिकल कॉलेजचे विशेष तज्ज्ञ वाळपई केंद्रात येतात.

आमदारांचे शिबिरांवर लक्ष

प्रत्येक आरोग्य शिबिरात सरासरी सहाशे ते सातशे रुग्णांनी लाभ घेतला असून एकूण ८ ते ९ हजारांहून अधिक लोकांनी शिबिराचा लाभ उठविला आहे. एएसजीआय इस्पितळ, वाळपई आरोग्य केंद्र, आरोग्य खाते, जीएमसी इस्पितळ यांच्या सहयोगाने शिबिरे झालेली आहेत. पर्येच्या आमदार दिव्या राणे, मंत्री विश्वजीत राणे हे नेहमीच आरोग्य शिबिरांवर लक्ष देताना दिसून आले आहे.

सहा ओपीडी विभाग

सर्जरी, ओर्थोपेडिक, गायनॅकोलॉजिस्ट, मेडिसीन, पेडिट्रीशयन, जनरल असे सहा ओपीडी विभाग आठवड्यातून दोन दिवस चालतात. त्यामुळे सत्तरीच्या लोकांना बांबोळीत जाण्याची आवश्यकता भासत नाही. वाळपईतच गोमेकॉतील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करीत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून दर ओपीडीला सहाशेहून अधिक रुग्णांची नोंद असते. या ओपीडीमुळे सत्तरी तालुक्यातील लोकांना खूप फायदा झाला आहे. वेळेवर उपचार मिळत असल्याचे नागरिक सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT