Save soil Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: 'ईशा फाऊंडेशन' बरोबर गोवा सरकारने केली सेव्ह सॉईल विषयी जनजागृती

Goa: शेतकऱ्यांना शंभर टक्के सॉईल हेल्थ कार्ड

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील नैसर्गिकरीत्या शेतीची अधिकाधिक वृद्धी व्हावी, यासाठी सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शंभरटक्के शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि माती आरोग्य कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) दिले जाणार असल्याची घोषणा डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

ईशा फाऊंडेशनबरोबर गोवा (Goa) सरकारने सेव्ह सॉईल याविषयी केलेल्या सामंजस्य करारावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री रवी नाईक, मुख्य सचिव पुनितकुमार गोएल, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मच्छिमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर, कृषी खात्याचे नेव्हिल अफान्सो यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील 16 गावे प्राकृतिक शेतीसाठी निवडली गेली आहेत. प्राकृतिक शेतीवर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केले असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे, असा आमचा प्रयत्न आहे. जे शेतकरी यशस्वीपणे प्राकृतिक शेती करणार आहेत, त्यांचा पुढील वर्षापासून सन्मान करण्यात येणार आहे. जलस्रोत खात्याच्यावतीने अमृत सरोवर योजनेखाली प्रत्येक जिल्ह्यात 75 जलतळी निर्माण केली जाणार आहेत.

त्याशिवाय वनसंरक्षक क्षेत्र सांभाळण्याचे काम सरकार करीत असल्याचे सांगत ते म्हणाले की, खाण, पर्यटन आणि शेती हे सर्व जमिनीशीच निगडित आहे आणि त्यावरच अर्थव्यवस्था चालते. माती संरक्षणाची चळवळ सुरू करताना शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माती तपासणीकरिता सॉईल हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. त्याशिवाय कृषी महाविद्यालयही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

* क्षणचित्रे

स्टेडियममध्ये सर्वांच्या हाती सेव्ह सॉईलचे पोस्टर देण्यात आले होते, त्यामुळे सर्वत्र सेव्ह सॉईल (save soil) हे वाक्य नजरेस पडत होते.

सुरुवातीला गोव्यातील कलाकारांनी पारंपरिक लोककला सादर केली. त्यानंतर ईशा संस्कृतीचे विद्यार्थ्यांनी ‘मानव आणि माती‘ हे नाते नृत्यातून सादर केले.

बाल भवन गोवाच्या मुलांनी ‘आमची माती‘ या गीताचे लोकार्पण केले.

सद्‍गुरू यांनी दीड तासाच्या भाषणात अनेक हलकेफुलके विनोद सांगत उपस्थितांना खिळवित ठेवले, मध्येच प्रश्‍न उपस्थित करण्याची त्यांची पद्धत अनेकांना भावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

Ajit Pawar: "दादा परत या"! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकांना अश्रू अनावर; बारामती दुःखात हरवली Watch Video

Antonio Costa: ''माझ्‍या कुटुंबाची मुळे गोव्यात'', युरोपच्या सर्वोच्च नेत्याचा 'गोमंतकीय' बाणा; CM सावंतांचं खास ट्विट VIDEO

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT