Vijai Sardesai, Venzy Viegas  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: सौरऊर्जेसाठी सरकारने प्रोत्‍साहन द्यावे; सर्व पंचायत क्षेत्रांमध्‍ये प्रकल्प उभारा

Solar Energy: पॅनल कंत्राटदारांना पैसे दिलेले नाहीत, पर्यटनकाळात खात्याने अल्पमुदतीसाठी वीज कनेक्शन दिले पाहिजे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सरकारी इमारती आणि शाळांच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसवून ३० मेगावॅट वीजनिर्मितीची घोषणा सरकारने केली. ‘गेडा’च्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन योजना जाहीर केली. पण त्यासाठी काहीच तरतूद केली नाही, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला.

वीज खात्यातील तफावती आणि दोष याकडे सरदेसाई यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. एका बाजूला तुम्ही अक्षयऊर्जा निर्मिती व्हावी म्हणून सांगता, तर दुसरीकडे सौरऊर्जा पॅनल बसविणाऱ्या कंत्राटदारांना गेल्‍या पाच महिन्यांपासून पैसे देत नाहीत, असे सरदेसाई म्‍हणाले.

ठिकठिकाणी विजेच्या खांबांवर तारांची जाळी दिसतात. वीज कर्मचारी तसेच सर्वसामान्यांसाठी ही जाळी धोकादायक ठरू शकतात. हा प्रकार खात्याला माहिती असूनसुद्धा त्‍याकडे कानाडोळा केला जात आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

आज फोंडा शहरात गेल्‍यावर जुन्या काळातील हैदराबाद, दिल्ली शहरात आल्यासारखे वाटते. मंत्र्यांनी त्यांचा मतदारसंघ सुधारावा. अनेक वर्षे तुम्ही मंत्री आहात, आता फक्त मुख्यमंत्री व्हायचे बाकी आहात, असा टोला सरदेसाई यांनी लगावला.

सर्व पंचायत क्षेत्रांमध्‍ये सौरऊर्जा प्रकल्प उभारा; व्‍हेंझी व्‍हिएगस

२०२५ मध्ये गोवा राज्‍य अक्षयऊर्जेत १०० टक्के परिपूर्ण होणार असे सरकार म्‍हणते. पण त्‍यासाठी सर्व पंचायत क्षेत्रांत सौरऊर्जा प्रकल्प उभारणे गरजेचे आहे, असे बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस यांनी विधानसभेत सांगितले. बाणावलीतील सातही ग्रामपंचायती यासाठी आपण देऊ शकतो, असे ते म्‍हणाले. सर्व सरकारांमध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, त्यामुळे या खात्याकड लक्ष द्यावे, असा सल्ला त्‍यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला. वीज खंडित करण्‍याबाबत लोकांना काहीच सांगितले जात नाही. वीज का खंडित करण्‍यात आली आहे, हे लोकांना समजले पाहिजे. किनारी भागात राहणाऱ्या लोकांना वीज कनेक्शन दिले जात नाही. पर्यटनकाळात खात्याने अल्पमुदतीसाठी कनेक्शन दिले पाहिजे, अशी सूचनाही त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arijit Singh Retirement: मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का, अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला रामराम; पोस्ट करत म्हणाला, "मी आतापासून..."

Harry Brook: 11 चौकार, 9 षटकार... हॅरी ब्रुकनं 29 चेंडूत कुटल्या 90 धावा; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

SCROLL FOR NEXT