Siddhi naik Case Dainik Gomantak
गोवा

सिद्धीच्या मृत्यूचे प्रकरण हाताळण्यात गोवा पोलिसांच्या 'गंभीर चुका'

सिद्धी नाईक प्रकरण गोव्याच्या 'कायदा आणि सुव्यवस्थेचे' प्रतिबिंबच; माजी मंत्री सुप्रियो..

दैनिक गोमन्तक

पणजी: अडीच महिन्यापूर्वी कळंगुट समुद्रकिनाऱ्‍यावर संशयितरित्या मृत्यू पावलेल्या सिद्धी नाईक प्रकरणाचा (Siddhi naik Case) तपास करण्यात गोवा पोलिस आणि सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी करत हे प्रकरण संसदेपर्यंत नेऊ, असे आश्वासन तृणमूलच्या खासदार  महुआ मोयत्रा यांनी दिले आहे.

सिद्धीच्या कुटुंबीयांची तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज त्यांच्या नास्नोळा-मयडे येथील घरी जाऊन भेट घेतली. सिद्धीचे आई-वडिल आणि बहिणींना धीर देत या शिष्टमंडळाने सिद्धीला न्याय मिळेल असे म्हटले आहे. या शिष्टमंडळामध्ये तृणमूलचे खासदार महुआ मोईत्रा, सौगत राय, माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, लुईझिन फालेरो उपस्थित होते. यावेळी वडील संदीप नाईक यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

माजी मंत्री सुप्रियो म्हणाले, सिद्धी नाईक प्रकरण गोव्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतीक आहे. एखाद्या तरुण मुलीच्या मृत्यूचे प्रकरण हाताळण्यात पोलिस किती गंभीर चुका करतात हे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सक्षम यंत्रणेकडून सखोल चौकशी व्हावी.

गोवा पोलिसांनी महिलांच्या मृत्यू प्रकरणासाठीची प्रमाणित प्रक्रिया पाळली नाही. या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी प्रत्येकजण हातमिळवणी करत असल्याचे दिसत आहे. आम्ही या कुटुंबाला मदत करू आणि हे प्रकरण दिल्लीत नेऊ. - महुआ मोईत्रा, खासदार, तृणमूल काँग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT