पणजी: ‘गोअन्स अगेन्स्ट कोरोना’ (Corona) या मोहिमेंतर्गत आम आदमी (Aam Aadmi Party) पक्षातर्फे सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिमीटर सेवेला (Oximeter Sarvice) गोमंतकीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या सात दिवसात 200 पेक्षा अधिक गृह अलगीकरणातील रुग्णांना ऑक्सीमीटर देण्यात आले आहेत. ज्यांना ऑक्सिमीटर मिळाला आहे त्यांनी पक्षाने सुरू केलेल्या कार्याबद्दल फेसबुकवरून प्रशंसा केल्याची माहिती गोवा प्रदेश संयोजक राहुल म्हांबरे (Rahul Mhambre) यांनी दिली. (Govekars spontaneous response to the oximeter service started by AAP))
गोव्यातील (Goa) कोविड प्रकरणात वाढ होत असताना, जेव्हा सरकारी किट तसेच फार्मसी दुकानांत ऑक्सिमीटरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला तेव्हा या आपत्तीत जनतेसाठी ‘आप’ने पुढाकार घेतला आणि गरजू रुग्णांना घरापर्यंत ऑक्सिमीटर पोहचविले. या आपत्कालीन परिस्थितीत आपच्या या उपक्रमाचे लोकांकडून स्वागत होत आहे. या पक्षाच्या मोहिमेला काहींनी व्यक्तिगतरित्या व काही संघटनांनी तसेच रुग्णालयांनी देखील मदतीसाठी सहकार्य केले, असे ते म्हणाले.
ऑक्सिमीटर सेवेचे समन्वयक अमित मलिक (Amit Malik) यांना लाभार्थींकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. मलिक यांनी व्हर्नल सिक्वेरा यांनी या सेवेबद्दल फेसबुक वर लिहिलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेख केला. सिक्वेरा यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे की, ‘ऑक्सिमीटरच्या कमतरतेमुळे ते गंभीररित्या चिंतीत होते, परंतु त्यांनी ‘आप’च्या ऑक्सिमीटर सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरला आणि दुसऱ्याच सेकंदाला त्यांना ‘आप’च्या टीमकडून कॉल आला आणि सकाळी उपकरण देखील मिळाले. त्यांनी यापूर्वी कधीही फेसबुकवर राजकीय पोस्ट केली नव्हती. परंतु आप निश्चितच एक अपवादात्मक राजकीय पक्ष आहे, असे सांगताना ते म्हणाले की आपची ही सेवा जीव वाचवण्यासाठी आहे आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदाच जाहीररीत्या फेसबुकवर आपचे कौतुक केले व आपच्या सेवेबद्दल भारावून गेले असे मलिक यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना मलिक यांनी सांगितले की, मेरशी येथील एका लाभार्थ्याने या सेवेबद्दल असे म्हटले की, गृह अलगीकरणातील रुग्णांसाठी वरदान तर सांतिनेझ येथील लाभार्थ्याने सरकार जे करू शकत नाही ते हे लोक करीत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून आम आदमी पक्षाचे कौतुक केले, तसेच म्हापसा येथील एका दुसऱ्या लाभार्थ्याने या सेवेबद्दलचा अभिप्राय त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना पाठविला.
‘आप’च्या ऑक्सिमीटर सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.