Safari Park in Goa पर्यटक आणि गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिलेला बहुप्रतिक्षित वन्यजीव सफारी पार्क नेत्रावळी किंवा मोले अभयारण्यात उभारण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हा पार्क साकारण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.
राज्यात पाच अभयारण्ये आहेत. यामध्ये विविध जाती-प्रजातींचे प्राणी तसेच पक्ष्यांचे वास्तव्य आहे. या अभयारण्यांचा राज्याच्या पर्यटन विकासामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.
वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अभयारण्यांबद्दलची महत्त्वाची माहिती दिली असून राज्यात लवकरच जंगल सफारी सुरू होणार असल्याचे म्हटले आहे.
मंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्रावळी किंवा मोले अभयारण्यात वन्यजीव सफारी पार्क उभारण्यासाठी त्यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
सफारी पार्क प्रस्तावामुळे गोव्यात येणारे पर्यटक हे फक्त समुद्र किनाऱ्यांकडेच न वळता इथल्या निसर्गरम्य प्रदेशाकडेही वळू शकतात.
मी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंदर यादव यांना या सफारी पार्कचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आहे.
जर गोव्यातील अभयारण्यात सफारी पार्क साकारला तर यामुळे राज्यभरातील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल आणि त्याचा एकंदरित अर्थव्यवस्थेला फायदा होईल.
- विश्वजीत राणे, वनमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.