Board Exams in Goa Dainik Gomantak
गोवा

परीक्षेला उपस्थित न राहू शकलेल्या गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी 'खूशखबर'

कोविड-19 मुळे गोवा बोर्ड दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची एकच सार्वजनिक परीक्षा घेण्याऐवजी दोन सत्र परीक्षा घेत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड काळात परीक्षेला उपस्थित न राहू शकलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. (Board Exams in Goa)

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटले आहे की, कोविड -19 (COVID-19) संसर्गामुळे डिसेंबर 2021- जानेवारी 2022 दरम्यान दहावी आणि बारावीची प्रथम सत्र परीक्षेस उपस्थित न राहू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) परत परीक्षेचे आयोजन केले जाईल. ही परीक्षा 10 फेब्रुवारीपासून घेतली जाण्याची शक्यता आहे, असे बोर्डाने म्हटले आहे. 2021-22 मध्ये बोर्डातर्फे प्रथम आणि द्वितीय टर्मच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे आणि काहींना कोविड -19 ची लागण झाल्यामुळे विद्यार्थी डिसेंबर-जानेवारी 2021-22 मध्ये झालेल्या दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्र परीक्षांना उपस्थित राहू शकेले नाहीत. अशा उमेदवारांसाठी, बोर्ड परत पहिली सत्र परीक्षा (Exam) घेईल. या परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याच्या दहा दिवस आधी जाहीर केले जाईल, असे बोर्डाने एका परिपत्रकात म्हटले आहे.

कोविड-19 मुळे गोवा बोर्ड दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाच्या शेवटी एकच सार्वजनिक परीक्षा घेण्याऐवजी दोन सत्र परीक्षा घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT