Margao Fatorda constituency Dainik Gomantak
गोवा

फातोर्डासह मडगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी

ही मंडळी कुठून व कां आली ती माहिती गुलदस्त्यात असली तरी गोवा पाहाण्यासाठी आल्याचे ते सीमा तपासणी नाक्यावर सांगतात

दैनिक गोमन्तक

मडगाव : विधानसभा निवडणुकीला मतदान अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे सध्या गोव्याबाहेर गेलेले मतदार राज्यात पुन्हा परतू लागले आहेत. मडगाव व फातोर्डा (Fatorda) मतदारसंघात हे प्रमाण प्रामुख्याने अधिक आढळून येत असल्याचे दिसते.

प्रत्येक निवडणुकीवेळी (Election) असेच चित्र असले, तरी यावेळी अक्षरशः आपल्या मूळ गावी गेलेल्या मतदारांचे लोंढे येत आहेत. केवळ रेल्वे व बसेसमधूनच नव्हे, तर ट्रॅक्स, जीपी व मिनिबसेस मधून ही मंडळी गोव्यात (goa) दाखल होत आहे. सीमेवरील वाहनाची नोंदवही तपासली तर गेल्या दोन दिवसांपासून अशी वाहने गोव्यात येऊ लागली आहेत.

मडगावात (Margao) खारेबांध, दवर्ली, मोतीडोंगर, आझाद नगरी येथे अशा प्रकारे आलेल्यांचे वास्तव्य आहे. काही जण विवाहसमारंभासाठी तर अन्य काहीजण गोवा पहाण्यासाठी आल्याचे सांगतात. परराज्यात नोंद झालेली वाहनेही तेथेच पार्क केलेली आहेत. एका अंदाजानुसार रोज अशा प्रकारे चारशे ते साडेचारशे लोक दाखल होत असून त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश आहे.

ही मंडळी कुठून व कां आली ती माहिती गुलदस्त्यात असली तरी गोवा पाहाण्यासाठी आल्याचे ते सीमा तपासणी नाक्यावर सांगतात. मिळालेल्या माहिती नुसार निर्धारीत स्थळी ही मंडळी पोचताच त्यांच्यासाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी त्यांना नेले जाते, तर रेल्वे वा बसने आलेल्यांसाठी तेथे वाहने सज्ज ठेवलेली असतात.

जाणकारांच्या म्हणण्याप्रमाणे राजकारणी (Politics) नेते मंडळींची ही व्यवस्था पूर्वापार चालून येत आहे. त्यांची मतदार कार्डे करण्यापासून ते मतदानाच्या पूर्वी त्यांना त्यांच्या ठिकाणाहून आणणे व मतदानानंतर पूर्ण बिदागी चुकती करून परत त्यांच्या मूळ ठिकाणी पोचविण्याचा व या दिवसांतील जेवणाखाण्याची तरतूद करण्याचाही त्यांत समावेश असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: आज अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

SCROLL FOR NEXT