Royal Enfield Rider Mania 2023: रॉयल एन्फिल्ड या चेन्नईस्थित भारतीय मोटरसायकल कंपनीने त्यांच्या आगामी Royal Enfield Rider Mania 2023 ची घोषणा केली आहे. गोव्यात यंदा 24 ते 26 नोव्हेंबर या काळात हा उपक्रम होणार आहे. रॉयल एन्फिल्ड कंपनीने सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे.
गतवर्षी कंपनीने या बायकिंग फेस्टिव्हलसाठी ‘मोटोवर्स’ थीमची घोषणा केली होती. मोटरसायकलिंग युनिव्हर्स या शब्दाचे हे लघुरूप आहे. यंदाच्या तीन दिवसात या महोत्सवात म्युझिक, आर्ट, वारसा, प्रेरणा आणि मोटरसायकलिंग लाईफस्टाईल याचा अनुभव घेता येणार आहे.
रॉयल एनफील्ड रायडर मॅनिया पहिल्यांदा 2011 मध्ये झाला होता. गेल्या काही वर्षात बुलेटप्रेमींमध्ये याची लोकप्रियता वाढली आहे. गतवर्षी हा इव्हेंट तीन वर्षानंतर झाला होता. या वर्षी हा मोटोवर्स 24 ते 26 नोव्हेंबर या काळात गोव्यातील वागातोर येथे होणार आहे.
नोंदणी प्रक्रिया आणि शुल्क
यात सहभागी होण्यासाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करावी लागेल. यासाठी प्रत्येकी 2,500 रूपये तिकीट आहे.
मोटोवर्स हा रॉयल एन्फील्ड यूनिवर्सचा महत्वाचा भाग आहे. नव्या युगाचे पॉप कल्चर कॅलेंडर इव्हेंट बनवण्याचा प्रयत्न कंपनी या इव्हेंटमधून करत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.