New Goa Film Shooting Rules:  Dainik Gomantak
गोवा

खुशखबर! गोमंतकीय फिल्ममेकर्सना चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या शुल्कात 40 टक्के सवलत

7 दिवसात अर्जावर प्रक्रिया न झाल्यास परवानगी मंजूर मानणार

Akshay Nirmale

New Goa Film Shooting Rules: राज्य सरकारने गुरुवारी नवीन गोवा चित्रपट शूटिंग नियम अधिसूचित केले आहेत, त्यानुसार गोव्यातील चित्रपट निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसना फीमध्ये 40 टक्के सवलत मिळेल.

नियमानुसार पंचायती आणि नगरपालिकांना करांव्यतिरिक्त 25,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याची परवानगी असेल, तर पणजी महानगरपालिका (CCP) 1 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकते.

द एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) परवानगी देण्यासाठी 25,000 रुपये प्रतिदिन आकारेल.

याशिवाय, इतर कोणतेही सरकारी विभाग देखील योग्य वाटेल तसे शुल्क आकारण्यास सक्षम असतील. चित्रीकरण गैर-व्यावसायिक स्वरूपाचे असल्यास आणि केवळ गोव्याच्या स्थानिक संस्कृतीला चालना देण्यासाठी केले जात असल्यास कोणतेही शुल्क लागू केले जाणार नाही.

नियमांमध्ये असेही नमूद केले आहे की, सक्षम अधिकाऱ्यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी अर्ज मंजूर करणे आवश्यक आहे. सात दिवसांच्या आत अर्जावर प्रक्रिया न झाल्यास परवानगी मंजूर मानली जाईल.

तसेच, जर चित्रीकरण हाती घेणाऱ्या चित्रपट निर्मात्याने आवश्यक परवानगी घेतली नसेल, तर अधिकारी नियमांनुसार शूटिंग उपकरणे जप्त करू शकतील. सरकारी विभाग, संस्था, ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि CCP यांना हे नियम लागू असतील.

ज्या अधिकाऱ्यांकडे अर्ज पाठवला आहे त्यांनी त्यांचे इनपुट पाच दिवसांत सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवावेत. संबंधित अधिकार्‍यांकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यास, प्रस्तावित चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी संबंधित अधिकार्‍याची हरकत नाही, असे मानले जाईल.

नियमानुसार सर्व प्रकरणांमध्ये परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय सक्षम अधिकाऱ्याने सात दिवसात घ्यायचा आहे.

चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी मागणारा अर्ज प्राप्त करणार्‍या सक्षम अधिकाऱ्याने आता हा अर्ज उपविभागीय पोलीस अधिकारी/आणि ज्यांच्या अधिकारक्षेत्रात चित्रपटाचे चित्रीकरण प्रस्तावित आहे त्यांच्याकडेही पाठवणे बंधनकारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT