Good Friday celebration In Goa: इस्टर संडेच्या (Easter Sunday) आधी येणाऱ्या शुक्रवारी गुड फ्रायडे (Good Friday) साजरा केला जातो. आजचा दिवस येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो.
गुड फ्रायडेच्या दिवशी मोती डोंगरावर असलेल्या चॅपल समोर 25 फूट उंच क्रॉसवर येशू ख्रिस्ताची प्रतिमा चढविण्यात आली. यावेळी हिंदू भाविकही सहभागी होत असल्याने धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.
एवढ्या उंचीवर येशूची प्रतीमा चढविण्याचे हे सासष्टी तालुक्यांतील एकमेव स्थळ असून यानंतर सायंकाळी येशूची शव यात्रा काढली जाते तेव्हा येशूची प्रतिमा ठेवलेल्या पेटीला एक खांदा हिंदू धर्माचे लोक देत असतात.
सकाळी येशूची प्रतीमा या क्रॉसवर चढविल्यानंतर दुपारी भाविकांच्या उपस्थितीत ती खाली उतरविण्यात आली. त्यांनतर सामूहिक प्रार्थना झाल्यावर सायंकाळी येशूची मोती डोंगरावरून अंत्ययात्रा निघून ती पायथ्याशी असलेल्या होली स्पिरीट चर्चमध्ये आणण्यात आली. या अंत्ययात्रेत हजारों भाविकांनी भाग घेतला होता.
सासष्टी तालुक्यातील कोलवा, बाणावली, माजोर्डा, बेतालभाटी, कुंकळ्ळी, वेळ्ळी, या तासेच अन्य गावात गुड फ्रायडे निमित्त प्रार्थना करण्यात आल्या.
गुड फ्रायडेचं ख्रिश्चन समाजात मोठं महत्त्व आहे. येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेचा हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी जगभरातील चर्चमध्ये धार्मिक प्रार्थना सभांचं आयोजन केले जाते.
येशू ख्रिस्ताने जगाला प्रेम आणि करुणाचा संदेश दिला आहे. रोम राजाच्या एका आदेशानंतर येशूला शुक्रवारच्या दिवशीच सुळावर लटकवण्यात आलं होतं. गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, इस्टर संडे साजरा केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.