GMC Contractual Employees Dainik Gomantak
गोवा

'गोमेकॉ'तील कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरीत कायम करण्याची मागणी, 12 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्यांचे शासनाला निवेदन

GMC Contractual Employees: गेल्या बारा वर्षांपासून करार (कंत्राटी) पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवांचे नियमितीकरण करून नोकऱ्या कायम करण्याची मागणी केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात गेल्या बारा वर्षांपासून करार (कंत्राटी) पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवांचे नियमितीकरण करून नोकऱ्या कायम करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त सचिवांकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे की, २०१३ पासून ते हृदयविकार विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळत असून रुग्णसेवा आणि विभागाचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक वर्षे सातत्याने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावूनही आजतागायत त्यांना कायम स्वरूपाची नोकरी मिळालेली नाही.

करार पद्धतीवर असल्यामुळे नोकरीची शाश्वती, वेतनवाढ, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा तसेच नियमित कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर लाभ त्यांना मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. दीर्घकाळ सेवा देऊनही कायमस्वरूपी सेवेत न घेणे अन्यायकारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचा संदर्भ दिला आहे. सार्वजनिक संस्थांमध्ये अनेक वर्षे अखंडपणे सेवा देणाऱ्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन त्यांच्या सेवांचे नियमितीकरण करण्याबाबत विचार करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारी यंत्रणांनी रोजगाराच्या बाबतीत न्याय्य धोरण अवलंबावे आणि दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांमध्ये आपण पात्र ठरत असल्याचा दावा करत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून आपल्या नोकऱ्या कायम कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjeel Kudchadkar Kidnapping Case: "चलत्या गाडीत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न!" संजील कुडचडकरची धक्कादायक जबानी; पत्नी लुईझा अद्याप बेपत्ताच

Jantar Mantar Student Protest: आंदोलक दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियांका गांधींचा रुद्रअवतार; विद्यार्थ्यांच्या दडपशाहीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

Goa Drowning Incident: उधाणलेल्या लाटा अन् जीवरक्षकांचे शौर्य! सलग तीन दिवसांत 3 होड्या उलटल्या; कोलवा आणि बाणावलीत 28 मच्छीमारांची सुखरुप सुटका

Goa ECO Sensitive Zone: गोवा सरकारला केंद्राचा मोठा झटका! 21 गावे वगळण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती अमान्य; 108 गावांवर 'जैवसंवेदनशील'ची टांगती तलवार

Horoscope 29 July 2026: बुधवारचा दिवस ठरणार भाग्यवान! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT