शिगमोत्सव Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीयांनी शिगमोत्सव कला जोपासावी!

रवी नाईक, फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समिती कार्यालयाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

फोंडा: शिगमोत्सवात सादर होणारी कला ही गोमंतकाची परंपरा आहे. ही परंपरा जपून ठेवताना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. कारण गोमंतकीय कला ही सर्वदूर पोचली आहे आणि गोमंतकीय कलाकारांना देश आणि विदेशात मिळणारा मान हा खरा म्हणजे गोमंतकीय कलेचा सन्मान असल्याचे उद्‍गार फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी काढले. तिस्क - फोंडा येथे आज फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समिती कार्यालयाचे उद्‍घाटन रवी नाईक यांच्या हस्ते झाले.

यावेळी शिगमोत्सव समितीचे उपाध्यक्ष अशोक नाईक, फोंडा पालिकेचे नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, कुर्टी - खांडेपार पंच सदस्य दादी नाईक, मडकईतील भाजपचे नेते सुदेश भिंगी तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. रवी नाईक यांनी गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कलेच्या क्षेत्रात विविध उपक्रम त्याकाळी राबवले, त्याचाच लाभ आज युवावर्गाला होत असून कलेची ही सेवा युवा कलाकारांकडून होत राहो, अशा शुभेच्छा देताना अंत्रुज शिगमोत्सव समितीच्या कार्याबद्दल त्यांनी गौरवोद्‍गार काढले. अशोक नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गुरुनाथ नाईक यांनी सूत्रसंचालन केले, तर रसिक पारकर यांनी आभार मानले.

‘रवी नाईक यांच्या कल्पकतेमुळेच कलाकारांना संधी’

रितेश नाईक यांनी रवी नाईक यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कलेच्या क्षेत्रात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले त्यामुळेच आज गोमंतकीय कलाकारांना वाव मिळाला असे सांगून गोमंतकीय सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी यापुढेही कलाकारांचे योगदान आवश्‍यक असल्याचे नमूद केले. आनंद नाईक यांनीही आमदार रवी नाईक यांच्या कल्पकतेमुळेच शिगमोत्सव, चित्ररथ, रोमटामेळ तसेच वेशभूषा आदी विभागात अनेक कलाकारांना त्यांची कला पेश करण्याची संधी राज्यभर मिळाली असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याला नाईटक्लब संस्कृतीची गरज नाही, बेकायदेशीर नाईटक्लब, डान्सबार बंद करण्याची वेळ आलीये; भाजप नेत्याचे वक्तव्य

Goa Accident: पणजीहून वेर्णाकडे जाताना काळाचा घाला! कुठ्ठाळी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, आसामच्या दोघांचा मृत्यू

Suryakumar Yadav: "मी आऊट ऑफ फॉर्म नाही, फक्त...'' तिसरा T20 जिंकल्यानंतर खराब फॉर्मवर 'मिस्टर 360' स्पष्टच बोलला

High Court: गुन्हा कबूल केला तरी शिक्षा नाही..! नवजात मुलीच्या हत्येप्रकरणी आईला हायकोर्टाचा मोठा दिलासा; जन्मठेपेची शिक्षा केली रद्द

'ईबी-5' व्हिसाची जागा घेणारे 'गोल्ड कार्ड': 'शुल्क भरा आणि नागरिकत्व मिळवा', अमेरिकेचा नवा मंत्र - संपादकीय

SCROLL FOR NEXT