Gomantak Swasthyam 2023 
गोवा

Gomantak Swasthyam 2023: ‘गोमन्तक स्वास्थ्यम’मध्ये साहिल गवस पहिला, पटकावले दहा ग्रॅम सोन्याचे मेडल

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Swasthyam 2023: गोमन्तक समूहातर्फे राबविल्या गेलेल्या ‘गोमन्तक स्वास्थ्यम 2023'' स्पर्धेचा बक्षीस वाटप समारंभ गोमन्तकच्या पणजीतील मुख्य कार्यालयात सोमवारी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. के. ब. हेडगेवार (कुजिरा) विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

या स्पर्धेतील दहा ग्रॅम सोन्याच्या मेडलचा विजेता साळचा शिवाजीराजे विद्यालयाच्या साहिल गवस ठरला.

कार्यक्रमास गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक, मुख्य व्यवस्थापक व्यवसाय प्रशासन सचिन पोवार, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अरुण पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

गोमन्तकच्या वतीने कुटुंबातील प्रत्येकासाठी आरोग्यविषयक प्रश्नमंजूषा स्पर्धा 1 मार्च ते 29 मे 2023 या कालावधीत राबविली होती. दररोजच्या अंकातून प्रसिद्ध झालेल्या कूपनवरील प्रश्‍नाचे उत्तर लिहिण्याची ही स्पर्धा होती. त्यात स्पर्धकांना 90 पैकी 80 कुपनावर दिलेल्या प्रश्‍नांचे उत्तर सादर करण्याची मुभा दिली गेली होती.

गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी मुलांना व त्यांच्यापालकांना वाचनसंस्कृती वाढावी याविषयी मार्गदर्शन केले. सतत गोमन्तक वाचावा, त्यातून तुम्हाला अवांतर ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानाचा तुम्हाला भविष्यात उपयोग होईल. त्यातून तुम्ही जबाबदार नागरिक होण्यासाठी व उज्ज्वल भविष्य घडवाल. तुम्हीच उद्याचे गोव्याचे भविष्य आहात.

मुख्याध्यापक सतरकर म्हणाले, सतत वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. अभ्यासाच्या पुस्तकांसह इतर वाचनाचीही सवय लावल्यास, शैक्षणिक ज्ञानाबरोबर इतर सामान्यज्ञानात भर पडते. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ठराविक वेळ निवडून ती वेळ एकत्रितरीत्या वाचनासाठी द्यावी, त्यातून चर्चा करावी आणि ज्ञान वाढवावे. यावेळी बक्षीस वितरणास विजेत्यांचे आई-वडील उपस्थित होते. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अरुण पाटील यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती सांगितली. सहायक वितरण व्यवस्थापक भारत पोवार यांनी आभार मानले.

दुसरे बक्षीस : (स्मार्ट टायटन घड्याळ)

खोर्ली-म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाचा नित्यम नीतेश कुडव व मंगेशी येथील व्ही. डी. आणि एस. व्ही. वागळे हायस्कूलचा वंश गावडे विजेता.

तिसरे बक्षीस : (सायकल)

मडगावच्या भाटिकर मॉडेल हायस्कूलची ऐश्‍वर्या श्रीपाद चव्हाण, वास्कोच्या सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटची दिया दीपक नाईक आणि रायबंदरच्या बालभारती विद्यामंदिराचा सोहम ज्ञानेश्‍वर शिरोडकर विजेता.

'गोमन्तककडून आज मला प्रथम सोन्याचे बक्षीस मिळाले. त्याचा मला खूप आनंद होत आहे. आमच्या घरी खूप वर्षांपासून गोमन्तक येतो, आम्ही गोमन्तकचे वाचक आहोत. आजचे सोन्याचे बक्षीस हे आमच्यासाठी एक आठवण म्हणून कायमस्वरूपी आमच्या सर्वांच्या स्मरणात राहील.' अशी प्रतिक्रिया साहिल गवस याने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT