Sakal Drawing Competition Dainik Gomantak
गोवा

'गोमन्तक-सकाळ'तर्फे रविवारी चित्रकला स्पर्धा, प्रवेश विनामूल्य; स्पर्धेच्या दिवशी थेट केंद्रावरही सहभागी होता येणार

Sakal NIE Drawing Competition 18 January: ‘गोमन्तक- सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धा’ यंदा येत्या रविवारी (ता. १८ जानेवारी) होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: चार दशकांची साक्षीदार असलेली आणि विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी देशातील सर्वांत मोठी आणि लोकप्रिय ‘गोमन्तक- सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धा’ यंदा येत्या रविवारी (ता. १८ जानेवारी) होत आहे. शालेय मुलांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिकांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. गोमन्तक-सकाळ माध्यम समूहातर्फे ही स्पर्धा होत आहे. ‘रिलायन्स डिजिटल’ या स्पर्धेचे असोसिएट पार्टनर असून ‘माय रोबो डॉट इन’ हे टेक पार्टनर आहेत.

‘गोमन्तक सकाळ’च्या वतीने गेल्या चार दशकांहून अधिक काळ म्हणजे १९८५ पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील अनेक स्पर्धा केंद्रांवर एकाच दिवशी आणि एकाच वेळी आयोजित केली जाणारी देशातील सर्वांत मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यंदा स्पर्धेचे हे ४१ वे वर्ष आहे. कोरोना काळातसुद्धा ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात झाली होती.

गेल्या चार दशकांमध्ये करोडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, २०१८ मध्ये स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या जागतिक स्तरावरील प्रमाणित संस्थांनी घेतली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, या हेतूने स्पर्धेची सुरवात झाली. दरवर्षी लाखो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत असून, त्यांचा सहभाग दरवर्षी वाढत आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना सहभागाची संधी

राज्यभरातील प्रमुख शहरांतील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, आदिवासी एकात्मिक प्रकल्प संचालित आश्रम शाळा, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग शाळांमधील विद्यार्थीसुद्धा या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेसाठी प्रमुख शहरांमधील आश्रम शाळा व विशेष आणि दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी ८६०५०१७३६६ या क्रमांकावर व rahul.garad@esakal.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा. स्पर्धा केंद्रांची विभागवार माहिती ‘गोमन्तक’मधून प्रसिद्ध केली जात आहे. इच्छुक विद्यार्थी आपल्या घराजवळच्या कोणत्याही केंद्रावर स्पर्धेच्या दिवशी थेट उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथीयांचं पाशवी कृत्य! हिंदू कुटुंबावर हल्ला करुन घर दिलं पेटवून; जीव वाचवण्यासाठी धडपड VIDEO

Pooja Naik: 'पूजा नाईक' प्रकरणावरुन विधानसभेत जोरदार खडाजंगी! 26 लाखांचा गुन्हा 17 कोटींवर कसा गेला? सरदेसाईंच्या प्रश्नावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

Goa Carnival 2026: उत्सुकता संपली! गोवा कार्निव्हलच्या तारखा जाहीर; संपूर्ण शेड्युल जाणून घ्या एका क्लिकमध्ये..

Goa Winter Session 2026: दिव्या नाईक यांच्या गळ्यात कारापूर-सर्वण सरपंचपदाची माळ

SCROLL FOR NEXT