Gomantak Parent Council Dainik Gomantak
गोवा

Gomantak Parent Council: ‘गोमंतक पालक परिषद’ मंच स्थापन करणार

शिक्षणतज्ज्ञांचा संकल्प ः 25 रोजी विशेष परिषदेचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यातील पालकांना संघटित करण्यासाठी काही शिक्षणज्ज्ञ पुढे सरसावले आहेत. ''गोमंतक पालक परिषद''या बॅनरखाली चळवळ सुरु करण्याचा संकल्प या शिक्षणतज्ञांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी (ता.25) डिचोली तालुक्यातील पालकांसाठी एका विशेष परिषदेचे आयोजन केले आहे. सायंकाळी 4 वा. डिचोलीतील दीनदयाळ सभागृहात ही परिषद होणार आहे.

पालक परिषदचा राज्यभर व्याप्ती आणि प्रसार व्हावा. त्यादृष्टीने विचारविनिमय करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणतज्ञ प्रा. दिलीप बेतकीकर यांनी डिचोलीत पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी (ता.20) डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेस शिक्षणतज्ञ आणि निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र गर्दे आणि कांता पाटणेकर यांच्यासह शिक्षक संदेश बाराजणकर तसेच कालिदास कवळेकर उपस्थित होते.

पालक आणि शिक्षक हे मुलांचे पंख आहेत. हे दोन्ही पंख समर्थ आणि प्रबळ असेल, तर मुलांची प्रगती ठरलेली आहे. तरीदेखील सद्यस्थितीत काही पालकांमध्ये उदासीनता दिसून येते. पालकांमधील मरगळ दूर करुन पालकांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी ''गोमंतक पालक परिषद'' स्थापन करण्याची कल्पना पुढे आली आहे.

या चळवळीच्या माध्यमातून पालकांना संघटित करुन त्यांच्या कर्तव्याबाबत वेळोवेळी जागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा.दिलीप बेतकीकर यांनी दिली.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे मोठा बदल अपेक्षित आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी पालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. हे धोरण लवचिक आहे. या धोरणामध्ये पालकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाची क्रिया जरी शाळेत होणार असली, तरी पालकांच्या सहकार्यावरच या धोरणाचे यश अवलंबून असणार आहे. मुलांचे कौशल्य विकसित करणे आणि त्यांच्या प्रश्नाबाबतीत पालकांना जागृत करणे.

हा पालक परिषद स्थापन करण्यामागील हेतू आहे, असे प्रा. बेतकीकर यांनी स्पष्ट केले. रामचंद्र गर्दे यांनी पालक परिषद स्थापन करण्यामागील हेतू सांगून, सद्यस्थितीत पालकांची भूमिका याविषयी विवेचन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT